Sunday lucky zodiac signs: आज होणार अनपेक्षित लाभ; रविवारी 'या' ४ राशींना मिळणार पैसा, शांतता आणि संधी

Horoscope today for money and peace: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला (Surya Dev) समर्पित असतो. सूर्य हा आत्मविश्वास, यश, सरकारी कामे आणि मान-सन्मानाचा कारक मानला जातो. आज, रविवारच्या शुभ योगात ग्रहांची स्थिती काही खास राशींसाठी अत्यंत अनुकूल बनली आहे.
Today's lucky zodiac signs
Today's lucky zodiac signssaam tv
Published On

आज १२ ऑक्टोबर, रविवार आहे आणि आश्विन कृष्णपक्षाची पंचमी तिथी चालू आहे. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. सूर्यदेवतेची पूजा केल्याने आरोग्य, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढतात असा समज आहे. पंचमीला नागदेवतेची पूजा शुभ मानली जाते, त्यामुळे हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे.

आज ग्रहस्थिती कशी आहे?

ग्रहस्थितीबघता चंद्र मकर राशीत प्रवास करणार आहे. यावेळी काही राशींवर शुभ योग बनत आहेत, ज्यामुळे मिळणाऱ्या संधींचा फायदा घेता येईल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आर्थिक नियोजनासाठी मध्यम रूपात अनुकूल आहे. मात्र राहुकालात कोणतंही शुभकार्य टाळणं योग्य ठरणार आहे. काहींना आज अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींना मानसिक शान्ती आणि कुटुंबाचा सहकार्य लाभणार आहे.

पंचांग माहिती

  • तारीख: १२ ऑक्टोबर २०२५, रविवार

  • तिथी: आश्विन कृष्ण पंचमी

  • वार: रविवार

  • नक्षत्र: कृत्तिका

  • योग: सौभाग्य योग

  • चंद्र राशि: मकर

  • सूर्य राशि: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२८

  • सूर्यास्त: सायंकाळी ५:५८

Today's lucky zodiac signs
Guru Gochar: तूळ राशीसह ३ राशी आतापासूनच साजरी करणार दिवाळी; अतिचारी गुरु देणार पैसा; घरी येणार लक्ष्मी

शुभ मुहूर्त व राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: दुपारी १२:०५ ते १२:५०

  • गुलिक काल: दुपारी ३:३० ते ५:००

  • राहुकाल: सायंकाळी ४:३० ते ६:०० (ही वेळ टाळावी)

  • अमृत काल: सकाळी ९:४० ते ११:१०

  • दुर्मुहूर्त: सकाळी ७:५० ते ८:४० आणि रात्री १०:१५ ते ११:०५

आजच्या दिवसात लाभ मिळवणाऱ्या चार राशी

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी आजचा दिवस खूप फलदायी ठरू शकणार आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे नवीन संधी समोर येणार आहेत. ज्या कामांमध्ये अडथळे येत होता ता आता दूर होण्याची शक्यता आहे.

Today's lucky zodiac signs
Ardhakendra Yog 2025: 25 सप्टेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; धनदाता शुक्र बनवणार खास योग

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना आत्मविश्वास वाढणार आहे. नेतृत्वगुण दिसून येण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिने दिवस अनुकूल असणार आहे. यावेळी काही चांगले व्यवहार साधता येण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे.

धनु राशी

धनु राशीसाठी आज मानसिक शांती आणि स्थैर्याचा दिवस आहे. प्रवासयोग संभाव्य असून तो फायदेशीर ठरू शकणार आहे. ज्यांच्याशी मतभेद होणार आहे. त्यांच्याशी नातं सुधारण्याची संधी येण्याची शक्यता आहे

Today's lucky zodiac signs
Mahalaxmi Rajyog 2025: 100 वर्षांनी दिवाळीला बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार धन-संपत्ती

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी नवी सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. करिअरमध्ये प्रगती, वरिष्ठांचे सहकार्य आणि महत्त्वाच्या निर्णयांत मदत मिळेल. प्रत्येक कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे.

Today's lucky zodiac signs
Hans Rajyog Diwali 2025: दिवाळीपासून 'या' राशींची धनाने भरणार झोळी; सोन्या-चांदीच्या नाण्यांचा होणार पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com