Todays Horoscope: वृषभ आणि मकरसोबत 'या 'राशींना गुरूवार ठरणार फायद्याचा; आज गुरूची कृपा कुणावर होणार, तुमच्या राशीत काय?

Aajche Rashi Bhavishya: कर्क आणि मकरसोबत इतर काही राशींना गुरूवार फायद्याचा ठरणार आहे. आज तुमच्या राशीत काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या.
Horoscope
Horoscope Today 13 June 2024Saam TV

आजचे पंचांग दिनांक १३ जून २०२४

गुरुवार दिनांक १३ जून २०२४. तिथी -ज्येष्ठ शुक्ल सप्तमी. नक्षत्र- पूर्वा. योग- वज्र. करण- गरज. रास- सिंह. दिनविशेष- उत्तम दिवस.

मेष- रागावर नियंत्रण ठेवा

काही वेळेला आपल्याकडून उगाचच कोणावर तरी आगपाखड होते. नंतर आपली चूक आपल्याला उमगते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आज याच गोष्टींवर अंकुश ठेवा आपल्याकडून कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. देवधर्माकडे कल ठेवा.

वृषभ- प्रवासामध्ये फायदा

रसिक अशी आपली रास आहे. त्यामुळे अनेक मजेच्या गोष्टी कराव्या, अशी मनात भावना मनात खूपदा येते. गोड बोलणे सहज जमते. त्या योगानेच कामाच्या ठिकाणी सुद्धा सहकाऱ्यांशी गोड बोलून काम करून घ्याल. प्रवासामध्ये फायदा होईल.

मिथुन- लाभ वृद्धिंगत कराल

आपल्याला मित्र-मैत्रिणींचा गोतावळा असतो. गप्पांमुळे सहजगत्या मित्र गोळा करता येतात. अशी आपल्या राशीची खासियतच आहे. इतरांशी छान संबंध ठेवाल आणि स्वतःचा लाभ वृद्धिंगत कराल.

कर्क- दिवस त्रासाचा

"बुडत्याचा पाय खोलात" असा आजचा दिवस आहे आपण. न केलेल्या गोष्टींची सुद्धा खापर आपल्यावर फोडणे जाईल. त्यामुळे मनस्ताप वाढेल, अतिचांगुलपणा कोणावर दाखवू नका. दिवस त्रासाचा आहे.

सिंह- सकारात्मकता वाढेल

व्यक्तिमत्वाला एक वेगळाच उजाळा आज येईल, सकारात्मकता वाढेल. दानात आणि उदारता यामुळे आपला इतरांवर अंकुश राहील.

कन्या- पैशाची गुंतवणूक

"ये रे ये रे पैसा" असा आजचा दिवस आहे. खूप दिवस आडून राहिलेले येणी वसूल होतील. त्यामुळे मन आनंदून जाईल. काही पैशाची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस पर्वणी घेऊन आला आहे.

तूळ- ताकद इतरांना समजेल

बलदंड असा आजचा दिवस आहे. म्हणजेच काय आपला पराक्रम वृद्धिंगत होईल. आपली ताकद इतरांना समजेल. कोणी आपल्याला कमी समजत असतील, तर आज आपल्या ताकतीची महती त्यांना समजेल.

वृश्चिक- सत्य लक्षात ठेवा

"का रे अबोला का रे दुरावा" असा आजचा दिवस आहे. घरामध्ये सगळं असूनसुद्धा कोणाशी बोलावं, अशी भावना होणार नाही. पण तरीसुद्धा आपली कामे करावी तर लागणार आहेत. सत्य लक्षात ठेवा.

Horoscope
Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांना सापडणार प्रगतीचे नवे मार्ग; फक्त काळजीपूर्वक पाऊले टाका

धनु- आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल

"माझ्या प्रीतीच्या फुला" असा आजचा दिवस आहे. एकूणच वातावरण गुलाबी राहील. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. देवाचे नावही मुखी असेल असा संमिश्र दिवस आहे.

मकर- गोड बोलून कामे करून घ्या

सातत्याने त्रास, दुखणे, कटकटी यांचा आता खरं कंटाळा आला आहे. म्हणून मनस्वास्थ्य जपा. कदाचित लोकांच्या संपर्कात राहून आपल्या अडचणी बाजूला ठेवू शकाल. हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घ्या.

कुंभ- कामांमध्ये यश

" क्षितिजा पलीकडे दिसते" असा आजचा दिवस आहे. आयुष्यामध्ये इंद्रधनु रंग भरणार आहे. एकूणच मनस्थिती छान राहील. घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. कामाच्या कक्षा वृंदावतील.

मीन- समजूतीचे वागणं गरजेचे

आपली रास खरंतर कधी कोणाला अपशब्द बोलत नाही. पण आज राग आणि उद्वेग याच्यामुळे असं वाटेल सगळे गेले खड्ड्यात. आपली मनस्थिती आपण जपणं गरजेचं आहे. काही वेळेला आपल्या स्वभावाचा इतर लोक गैरफायदा घेतात, तो टाळा थोडे शहाणपणा किंवा समजूतीचे वागणं आज गरजेचे आहे.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Horoscope
Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांसाठी रविवार ठरणार खास; कामात मिळणार घवघवीत यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com