Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांसाठी रविवार ठरणार खास; कामात मिळणार घवघवीत यश

Horoscope Today 9 June 2024 : आजचे राशी भविष्य, राशीचक्रानुसार ग्रहमंडळात दररोज नवनवीन बदल होत असतात. जे जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. रविवार काही राशींच्या लोकांसाठी खास ठरणार आहे.
Rashi Bhavishya
Today's Rashi Bhavishya 9th June 2024, Horoscope TodaySaam TV

आजचे पंचांग ९ जून २०२४

वार - रविवार. तिथी- ज्येष्ठ शुक्ल तृतीया. नक्षत्र - पुनर्वसू. योग - वृद्धी. करण - गरज. रास - मिथुन. दिनाविशेष - उत्तम दिवस.

मेष : यशाचा मुकुट चढेल

आजच्या दिवशी हट्ट आणि जिद्दीने कामांमध्ये रहाल. महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अर्थात यशाचा विशेष मुकुट आज चढणार आहे हे नक्की.

वृषभ : दिवस विशेष महत्त्वाचा

आर्थिक निर्णयांच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा. आपण घेतलेले आर्थिक नियोजनाचे निर्णय योग्य मार्गावर आहेत याची खात्री होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे त्याचा आनंद घ्या.

मिथुन : तरंग मनामध्ये उठतील

सकारात्मकतेने भरलेला आजचा दिवस आहे मानसिक स्वास्थ्य समाधान लाभेल. आनंद आणि आशावाद याचे तरंग मनामध्ये उठतील. खरंतर आपल्या रशिस्वभाव विरुध्द लक्षणे आहेत पण याच दिवसाचे सोने करा.

कर्क : कामे रखडण्याची शक्यता

काही वेळेला आपला हात जगन्नाथ असेच कामे केलेली बरी असतात. कोणाचेही सहकार्याची अपेक्षा नको. एखाद्या काम ठरवलं तर ती दैनंदिन कामे सुद्धा रखडण्याची दाट शक्यता आहे.

सिंह : अनेक लाभ होतील

अनेक लाभ पदरात पडतील सर्वांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींवर आज आपला वट राहील रादर त्यांच्यासाठी विशेष काहीतरी करण्याची आज भावना होईल.

कन्या : दिवस आनंदाचा असेल

कामासाठी विशेष बैठकी आणि भेटीगाठी आज होतील. वरिष्ठ त्याचबरोबर आपल्या ऑफिसमधील सहकारी यांचे चांगले सहकार्य मिळेल. दिवस आनंदाचा.

तुळ : अध्यात्माकडे कल राहील

कार्यक्षेत्र व्यापक राहील मोठे प्रवास किंवा त्याची आखणी या गोष्टी आज आपल्या कामाच्या स्वरूपात दिसत आहेत. देवधर्म आणि अध्यात्म याच्याकडे कल ठेवल्यास दिवस अधिक सुकर होईल.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांना सापडणार प्रगतीचे नवे मार्ग; फक्त काळजीपूर्वक पाऊले टाका

वृश्चिक : खर्च वाढता राहील

खर्च वाढता राहणार आहे. विनाकारण ताण आणि त्रास घेतल्यास तब्येत आणि मनस्वास्थ दोन्हीही खराब होईल. अचानक मिळणारा पैसा याच्यापासून सावध राहा.

धनु : यश मिळण्याचा दिवस

कोर्टकचेरीच्या कामात आज यश मिळण्याचा दिवस आहे. व्यवसायाच्या गोष्टी आणि निर्णय हे महत्त्वाचे धरून त्यावर काम करा. पुढील कामाची नव्याने बांधणी आज होईल. जोडीदाराबरोबर योग्य सहकार्य केल्यास जीवनात आनंदी आनंद.

मकर : आज जरा सावध राहा

हाताखालचे लोक नोकर चाकर यांच्यापासून जरा सावध रहा. वस्तू गहाळ होणे किंवा चोरी होणे अशा गोष्टी आज घडू शकतात. जुनी दुखणी डोके वर काढतील. त्यामुळे तब्येत जपा आजचा असा आजचा संदेश आहे.

कुंभ : आजचा दिवस छान राहणार

मनोरंजन कला संस्कृती यामध्ये विशेष आवड आज निर्माण होईल. बौद्धिक गोष्टी करण्याकडे सुद्धा विशेष कल राहील. संततीला योग्य मार्गदर्शन केल्यास दोघांसाठी दिवस आजचा छान राहणार आहे.

मीन : शुभ फळ मिळेल

आईची आज विशेष काळजी घ्या. घरामध्ये पाहुण्यांची सरबराई राहील. त्यांच्या आगत्या मध्ये दिवस जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विशेष दत्त उपासना केल्यास दिवसाचे शुभ फळ आज तुम्हाला मिळेल.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : 'या' राशींना कामात मिळणार यश, वाटेतील अडथळे होतील दूर; वाचा आजचं राशी भविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com