Rashi Bhavishya : जूनच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींना मिळणार गोड बातमी; तुमची रास यात आहे का? वाचा राशी भविष्य

Today's Rashi Bhavishya Marathi : ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली जागा बदलत असतात. ज्याचा थेट परिणाम राशींवर होतो. १ जून रोजी तुमच्या नशिबात काय लिहलंय, जाणून घ्या राशी भविष्याच्या माध्यमातून
Rashi Bhavishya
Today's Rashi Bhavishya 1 June 2024, Horoscope TodaySaam TV

आजचे पंचांग १ जून २०२४

वार - शनिवार. वैशाख कृष्णपक्ष तिथी नवमी - दशमी. रास - मीन. नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा, योग - प्रीती. करण - गरज. दिनविशेष श्रेय तिथी.

मेष : विचारपूर्वक निर्णय घ्या

"एका ना धड भाराभर चिंध्या" असा आजचा दिवस होऊ शकतो. मनस्थिती द्विधा राहील आणि म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या आणि पुढे चला.

वृषभ : आज आनंदाचा दिवस

"जोडी तुझी माझी" असा आज मैत्रीसाठी दिवस राहील. काही वेळेला आपण आपल्या मित्र आणि मैत्रीसाठी जीव तोडून सगळ्याच गोष्टी करतो. तोच आजचा दिवस. आनंद लुटा.

मिथुन : कामाचे चीज होईल

"आज आकाश ठेंगणे वाटेल". डोक्यावरचा रवी विशेष उत्तुंग यश देईल. कामांमध्ये मान मरातब वाढेल. केलेल्या कामाचे चीज होईल.

कर्क : विशेष उपासना फलदायी ठरेल

"देवाजीच्या दारी आज रंगला अभंग' असा आजचा दिवस आहे. विशेष उपासना फलदायी ठरेल. कामे पूर्णत्वाला जाताना दिसून येईल.

सिंह : शरीर आणि मनाला जपा

"ये रे माझ्या मागल्या" अशा काही गोष्टी होतील .जुन्या गेलेल्या गोष्टी पुन्हा त्रासाने नवीन डोके वर काढतील. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीला जपा. त्रस्तता आजूबाजूला नांदत आहे असे वाटेल.

कन्या : द्विधा मनस्थितीचा दिवस

"इकडे आड तिकडे विहीर" सगळीकडे घरात, कामांमध्ये सुजलाम सुफलाम आहे. म्हणून हे करू का ते आज यात द्विधा मनस्थितीत दिवस असण्याची शक्यता आहे.

तूळ : कटकटीचा ससेमीरा मागे लागेल

"सुखाच्या सरी वेशीवर टांगल्यात का?" अशीच भावना होईल. कितीही केलं तरी त्रास आणि कटकटी यांचा ससेमीरा मागे लागणार आहे. विशेषत्वाने तब्येत जपा.

Rashi Bhavishya
Kark Rashi Nature : खेकड्यासारखी प्रवृत्ती, इतरांना मागे खेचण्यात पटाईत; कर्क राशीचे लोक नेमके कसे असतात? वाचा...

वृश्चिक : विशेष यश मिळेल

शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी दिवस चांगला. संततीकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी कामामध्ये मन गुंतवल्यास विशेष यश हाती येऊ शकेल.

धनु : फसवणूक होऊ शकते

भिन्नलिंगी व्यक्ती विषयी आकर्षण वाटेल. कदाचित त्यामध्ये फसण्याचे योग आहेत. त्यामुळे स्वतःला जपा. कामावर लक्ष केंद्रीत करा.

मकर : पराक्रमाकडे वाटचाल कराल

"कधी कधी शांतताच अकांत करते"असे वाटते तो आजचा दिवस. शांततेवर मात करून पराक्रम करण्याकडे वाटचाल करा. पत्रव्यवहारामधून कामाची सफलता दिसते आहे.

कुंभ : जुन्या गोष्टी सापडतील

घर आवरताना जुन्या गोष्टी सापडतील. त्यामध्ये रममाण व्हाल. जुने वस्त्र, अलंकार यामध्ये आपल्या आठवणी शोधाल. कुटुंबीय समवेत विशेष महत्त्वाचा दिवस. रसना साथ देईल.

मीन : स्वप्नांना पंख फुटतील

व्यक्तिमत्व बहरेल. लोकांना आकर्षित करून घ्याल. विशेष खरेदी कराल. सकारात्मकता वाढेल. स्वप्नांना पंख फुटतील.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : आज 'या' राशीच्या मनासारख्या घटना घडतील; मे महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com