Weekly Horoscope: 'या' राशींना शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly horoscope business loss share market: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची सतत होणारी स्थिती आपल्या आर्थिक जीवनावर थेट परिणाम करत असते. आगामी आठवड्यात काही ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे विशिष्ट राशीच्या लोकांसाठी आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने धोका वाढण्याची शक्यता आहे.
पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

सप्ताहाची सुरुवात आरोग्य बिघडविणारी असून, मानसिक स्थिती खराब राहील. उत्तरार्धात चंद्र-शुक्र युतीमुळे जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील.

वृषभ

मुलांच्या समस्यांवर मार्ग काढावा लागेल, शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते. उत्तरार्धात नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल. जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरी, वादविवाद टाळावेत.

मिथुन

घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. चंद्र-शुक्र युतीमुळे मुलांच्या समस्या सुटतील. निवडणुकीत यश मिळेल, नोकरीत पदोन्नती होईल.

कर्क

घरातील वातावरण प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्ती भेटतील. घर, वाहन खरेदीची संधी मिळेल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मतभेद संभवतात.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
कार्तिक कृष्ण दशमी: आज सिंह राशीवर चंद्राची कृपा; पाहा कोणत्या राशींना मिळणार मोठा लाभ

सिंह

आर्थिक व्यवहार जपून करावेत. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. सहली, छोट्या प्रवासातून आनंद घ्याल. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांना यश, प्रसिद्धी मिळेल.

कन्या

जोडीदाराशी मतभेद संभवतात. चंद्र-शुक्र युतीमुळे आर्थिक आवक चांगली राहील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. निवडणुकीत मोठे यश मिळेल.

तूळ

चोरांपासून सावध राहावे. किमती वस्तूंची काळजी घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळावेत. खेळ, कला मनोरंजनाचा आनंद घ्याल. वैवाहिक सौख्यात आनंद मिळेल. कर्जाची कामे होतील.

वृश्चिक

शेअर्ससारख्या व्यवसायात पैसे अडकतील. चंद्र-शुक्र युतीमुळे उत्तरार्धात मोठ्या प्रवासाचे योग येतील. परदेशगमनाचे बेत होतील. राशीतील अमावस्या आरोग्यासाठी प्रतिकूल राहील.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Today's lucky zodiac signs: आजचा दिवस ठरणार खास; 'या' ४ राशींवर धनसंपत्ती आणि यशाचा वर्षाव

धनू

उत्तरार्धात मोठे आर्थिक लाभ होतील, उंची वस्तू, वस्त्र, अलंकार, भेटवस्तू यांची प्राप्ती होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यय स्थानातील अमावस्या मोठे खर्च करणारी राहील.

मकर

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. उत्तरार्धात मोठी कामे होतील. स्त्री वर्गाकडून मोठी मदत होईल. नवीन नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Virgo Horoscope 2025 : कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे जाईल? उजळेल भाग्य, पण जपा आरोग्य

कुंभ

कौटुंबिक वारसा हक्काच्या कामात दिरंगाई, मनस्ताप संभवतो. चंद्र-शुक्त युतीमुळे उत्तरार्धात प्रगतीसाठी मोठी संधी मिळेल. कला, खेळ, स्पर्धांमध्ये यश-प्रसिद्धी मिळेल, तीर्थयात्रा, प्रवास होतील.

मीन

कोर्टकचेरीच्या कामात मनस्ताप संभवतो. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होईल. भाग्य स्थानात होणारी अमावस्या नवीन संधी देणारी राहील. निवडणूक, कोर्टकचेरीमध्ये विजय मिळेल.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Zodiac signs luck: कन्या राशीत चंद्र! आज या 4 राशींचं नशीब बदलेल एका क्षणात; जाणून घ्या दिवस कसा जाणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com