Shardiya Navratri 2025: हिऱ्याप्रमाणे चमकणार 'या' राशींचं नशीब; आर्थिक स्थिती मजबूत होणार

Zodiac signs luck will shine: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची शुभ स्थिती काही राशींसाठी खूप चांगले दिवस घेऊन येते. लवकरच काही ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य अचानक उजळणार आहे.
Shardiya Navratri 2025
Shardiya Navratri 2025saam tv
Published On

वैदिक पंचांगानुसार, सोमवार दिनांक २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होणार आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात हा पवित्र उत्सव साजरा केला जातो. या काळात देवी दुर्गा आणि त्यांच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. भक्त उपवास करून देवीची मनोभावे पूजा करतात.

असं मानलं जातं की, माता दुर्गेची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात. ज्योतिषांच्या मतानुसार, यंदाच्या शारदीय नवरात्राच्या काळात काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा होणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे या राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात समाधान मिळणार आहे.

Shardiya Navratri 2025
Shani Gochar: होळीनंतर न्यायदेवता शनी करणार राशी बदल; 'या' राशींचं भाग्य उजळणार, बरसणार शनीदेवाची कृपा

शनि गोचर २०२५

सध्या शनिदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. या राशीत ते जवळपास दोन दीड वर्ष राहतील. त्यानंतर ते पुढील राशीत प्रवेश करणार आहेत. सध्या मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. मीन राशी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. तर कुंभ राशीवर अंतिम टप्पा चालू आहे.

Shardiya Navratri 2025
Shani Vakri: 2025 मध्ये 'या' राशींचं पलटणार नशीब; शनीच्या वक्री चालीने तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा अत्यंत मंगलकारी ठरणार आहे. सध्या शनिदेवाची दृष्टि तुमच्या एकादश भावावर आहे. अनेक क्षेत्रात तुम्हाला शुभ फल मिळणार आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होऊ शकणार आहे. शत्रूंवर सहज विजय मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होणार आहे. करिअर आणि व्यवसायात धनलाभ होणार आहे.

Shardiya Navratri 2025
Tri Ekadash Yog: २० मे पासून शनी-सूर्य ३ राशींना करणार मालामाल; त्रिएकादश योग देणार पैसा

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांवर शारदीय नवरात्रात शनिदेव प्रसन्न राहणार आहे. या काळात जीवनात नवा उत्साह निर्माण होणार आहे. शनिदेव या राशीला नेहमीच शुभ फळ देतात. आरोग्य चांगले राहणार आहे. शत्रूंवर विजय मिळणार आहे. सरकारी कामकाजातून लाभ मिळणार आहे. शुभ कार्यांमध्ये यश मिळेल. नवरात्राच्या दिवसांत रोज भक्तिभावाने देवी दुर्गेची पूजा करा.

Shardiya Navratri 2025
Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com