Shukra Surya Yuti: होळीला शुक्रादित्य राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं भविष्य; सूर्य-शुक्राची राहणार कृपा

Venus And Sun Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक कालांतराने आपल्या राशी बदलतात. याच संदर्भात आज, १४ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडणार आहे. ग्रहांचा अधिपती सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Shukraditya Yoga
Shukraditya Yogasaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशातच आज म्हणजेच 14 मार्च रोजी होणार आहे. 14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव मीन राशीत भ्रमण करणार आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी शुक्र ग्रह आधीच उच्च अवस्थेत आहे. यामुळे एका खास राजयोगाची निर्मिती होत असते.

शास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. या लोकांना अचानक धन आणि प्रगतीची संधी मिळणयाची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींचा याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Shukraditya Yoga
Mangal Gochar: मंगळ 'या' राशींचं जीवन करणार अमंगल; शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने येणार भूकंप, राहा सावधान

मीन रास

शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती आपल्यासाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुमची कार्यशैली सुधारणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुमच्या उत्पन्नात ही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवू शकणार आहात. प्रवासाची दाट शक्यता आहे.

वृषभ रास

शुक्रादित्य राजयोग तयार झाल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यावेळी तुम्ही अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवण्यात यशस्वी होणार आहात.

Shukraditya Yoga
Shadashtak Yog: शनि-केतुमुळे तयार होणार्‍या षडाष्टक योगाने 'या' राशींना मिळणार महालाभ; आर्थिक संकट-आयुष्यातील अडचणी होणार दूर

धनु रास

शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी आनंददायी ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. तुम्ही नोकरदार लोकांना बढती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकणार आहे. हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप चांगला असणार आहे.

Shukraditya Yoga
Shash Mahapurush Rajyog: आज होळीच्या दिवशी शनीने बनवला शश राजयोग; 'या' 3 राशींना गोल्डन टाईम होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com