Saturday Horoscope : पैसा कमवण्याचा मार्ग मोकळा होईल, 5 राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस तणावात जाण्याची शक्यता

Today Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींचा शनिवारचा संपूर्ण दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य.
Saturday Horoscope
horoscopeSaam tv
Published On

मेष

मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यवसायात नफा होण्याची शक्याता आह. प्रवास लाभदायक ठरू शकतो. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल, अन्यथा निर्णय चुकू शकतात. आर्थिक बाबतीत काही अडचणी जाणवू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक वातावरण राहील. आरोग्यात सुधारणा होईल आणि जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा मिळू शकतो. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद टाळण्यासाठी संयमाने वागा. मेहनतीचे फळ मिळेल आणि शुभवार्ता मिळू शकते.

कर्क

आजचा दिवस आनंददायी ठरण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन बचत करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या मतांचा आदर केल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील.

सिंह

छंद पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ देण्यासाठी दिवस अनुकूल आहे. जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करताना मात्र विशेष काळजी घ्या.

Saturday Horoscope
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'हे' काम अन्यथा २००० रूपये मिळणार नाहीत, महत्त्वाची अपडेट समोर

कन्या

कार्यालय आणि घरातील काही तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. पैशांशी संबंधित काही अडचणी जाणवतील. व्यवसायासाठी दिवस अनुकूल राहील. कुटुंबीयांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल.

तुळ

खरेदी किंवा छोट्या सहलीचे नियोजन करू शकता. दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने केल्यास मानसिक शांतता मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवणे लाभदायक ठरेल.

वृश्चिक

प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगतीची इच्छा अधिक तीव्र होईल. प्रवासाचे योग असून मानसिक समाधान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु

कामात यश मिळेल आणि कार्यालयात तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतील. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याची इच्छा होऊ शकते. कोणत्याही नियोजनात जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या.

मकर

प्रभावशाली व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक ताण जाणवू शकतो, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. कार्यालयात वेळेचा योग्य वापर करा. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

Saturday Horoscope
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

कुंभ

आजचा दिवस सर्वसाधारणपणे चांगला राहील. कोणालाही पैसे उधार देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल आणि एखादे सुखद सरप्राईज मिळू शकते. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे.

मीन

आरामाची गरज भासेल, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वास वाढेल आणि आवश्यक गोष्टी सहज उपलब्ध होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत मनात काहीशी अस्थिरता राहू शकते तसेच जोडीदाराच्या आरोग्याची चिंता वाटू शकते.

डिस्क्लेमर : हे राशीभविष्य ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून यातील माहिती सर्वांसाठी तंतोतंत लागू होईलच असे नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com