Saturday Horoscope: शनिवारी 'या' ४ राशींवर होणार पैशांचा पाऊस; पाहा कोणाला कसा मिळणार लाभ?

Friday Horoscope Marathi: १७ मे २०२५ रोजी कोणत्या राशींना विशेष लाभ मिळू शकतो हे आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या राशींवर विविध प्रकारे परिणाम होतो.
Horoscope
Horoscopesaam tv
Published On

उद्या १७ मे असून या दिवशी ग्रहांची स्थिती कशी असणार आहे, शिवाय याचा राशींवर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात. या दिवशी सूर्य वृषभ राशीत आणि चंद्र दिवसभर धनु आणि मकर राशीत भ्रमण करेल. शुक्र मीन राशीत उच्च स्थितीत असणार आहे. साध्य आणि शुभ असे दोन चांगले योग असतील आणि दिवसभर अमृत योग राहील, जो अत्यंत शुभ आहे.

सकाळी पूर्वाषाढा नक्षत्रात चंद्राचं भ्रमण असल्याने काही काळ गंड मूळ योगाचा प्रभाव राहणार आहे. त्याचप्रमाणे राहुकाल सकाळी असणार आहे. यावेळी कोणतेही शुभ कार्य टाळावेत. अमृत काळ आणि अभिजीत मुहूर्त शुभ कार्यांसाठी उत्तम आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

वृषभ रास

उद्याच्या दिवशी सूर्य वृषभ राशीत असल्याने या राशीच्या व्यक्तींना ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी तुमच्या आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतात.

Horoscope
Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार नक्षत्रामध्ये गोचर; 'या' राशींचं नशीब चमकणार, कमाईही तगडी होणार

धनु रास

उदाच्या दिवशी चंद्र दिवसभर धनु राशीत भ्रमण करणारआहे. या राशीच्या व्यक्तींना भावनिक आणि मानसिक स्तरावर सकारात्मकता जाणवू शकणार आहे. प्रवास किंवा धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढू शकते. काही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

शुक्र मीन राशीत उच्च स्थितीत असल्याने या राशीच्या व्यक्तींना प्रेम, कला आणि सौंदर्य या क्षेत्रांमध्ये लाभ मिळू शकणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध सुधारू शकतात.

Horoscope
Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार नक्षत्रामध्ये गोचर; 'या' राशींचं नशीब चमकणार, कमाईही तगडी होणार

मिथुन रास

गुरु मिथुन राशीत असल्याने ज्ञान, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. उद्याच्या दिवशी सामाजिक स्तरावर मान-सन्मान वाढू शकतो. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळू शकतो.

Horoscope
Friday Horoscope: गुरुवारचा दिवशी 'या' ४ राशींना मिळणार नशीबाची साथ; पाहा काय काय फायदे होणार?

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com