दैनिक पंचांग - मंगळवार १ ऑक्टोबर २०२४ भाद्रपद कृष्णपक्ष. शस्त्रादिहत पितृ श्राध्द. तिथी- चतुर्दशी २१|४० रास- सिंह. १६|०२ नं.कन्या. नक्षत्र- पूर्वा. योग- शुक्ल योग. करण- विष्टिकरण. दिनविशेष- चतुर्दशी वर्ज्य
मेष - आपल्याला मिळालेले हे आयुष्य आपल्या काही पूर्वकर्माशी निगडित असते. पितृपक्ष सुरू असल्यामुळे या सर्व ऋणातून मुक्तीसाठी आज विशेष कर्म करावे. त्याचा फायदा होईल. उपासनेसाठी दिवस चांगला राहील.
वृषभ - खूप कालावधीपासून रेंगाळलेले जागेचे व्यवहार आज मार्गी लागतील. आपल्या आवडीच्या गोष्टींची खरेदी घरासाठी होईल. दिवस सुखाची प्राप्ती करून देणार असे दिसते आहे.
मिथुन - बोलण्यामध्ये पराक्रम दिसून येईल. व्यवसायाशी नवीन गोष्टी आज वाढीस लागतील. लोकसंग्रह वाढेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर आज विशेष खुश व्हाल.
कर्क - धनयोग उत्तम राहतील. घरातील वातावरण आनंदी आणि हसरे खेळते असे असेल.पाहुण्यांची ऊठबस राहील. ठरवलेल्या गोष्टी योग्य वेळेत झाल्यामुळे एक प्रकारचे समाधान लाभेल.
सिंह - आपल्यातील असलेला आत्मविश्वास आज वेगळ्या प्रकारे उजळून निघेल. मोठे काम घेण्याची आणि ती पार पडण्याची धडाडी आज दिसेल. आपला प्रभाव इतरांवर राहील.
कन्या - असेल तर असेल नसेल तर नसेल हे मन सांगेल. पण निर्णय घेताना मात्र कचराल. द्विधा मनस्थिती दूर करावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवून येईल. ध्यानावर लक्ष केंद्रित करा.
तूळ - प्रेमाच्या गोष्टीत यश मिळेल. साठून राहिलेल्या गोष्टी सहज व्यक्त कराल. मित्रांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे आज योग आहेत. दिवसाच्या शेवटी आनंद भरलेला असेल.
वृश्चिक - आपल्यातली क्षमता सिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे. अनेक हत्तींचे बळ घेऊन आज काम कराल. त्यामध्ये यशही दिसून येते आहे. पुढील गोष्टींची नव्याने पायाभरणी कराल.
धनु - प्रवासासाठी दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. काही आखणी दूरच्या प्रवासांसाठी आज होऊ शकेल. आयुष्यामध्ये आपल्यासाठी सहज काही गोष्टी देवाने झोळीत टाकल्या आहेत. त्याकडे सकारात्मकतेने पहा.
मकर - अडचणींवर मातच करावी लागेल. गोष्टी ठरवल्या तर तशा होतील असे सांगता येत नाही. राशीलाच असणारा विलंब आज दिवसा मध्ये दिसणार आहे. हे स्वीकार करण्याच्या तयारीत रहा.
कुंभ - तुझ्या माझ्या मनाचे गुज उलगडेल असा जोडीदाराबरोबर चा दिवस आहे. तात्विक मतभेद राहिले तरी मनभेद होणार नाहीत. एकत्र येऊन अनेक चांगल्या गोष्टी कराल.
मीन - न केलेल्या गोष्टी मागे लागतील. सिद्ध करण्यात आपण हतबल राहाल. म्हणून काही ठराविक लोकांपासून जसे की नोकर चाकर, अजोळचे लोक, गुप्तशत्रू यांच्यापासून सावध राहण्याचे आज संदेश आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.