Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 6 October 2024 : दैनिक पंचांग - रविवार ६ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्लपक्ष. विनायकी चतुर्थी. तिथी-तृतीया ०७|५०. या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

दैनिक पंचांग - रविवार ६ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्लपक्ष. विनायकी चतुर्थी. तिथी-तृतीया ०७|५०. रास-तुला १७|३४ नं. वृश्चिक. नक्षत्र-विशाखा. योग-प्रितियोग. करण-गरज. दिनविशेष-विशाखा वर्ज्य.

मेष - आपल्या मनात व्यवसायाशी निगडित काही महत्त्वाचे प्लॅन आहेत का? तर ते आज पूर्ण होतील भागीदाराबरोबर आणि इतर क्लाइंट बरोबर आज महत्त्वाच्या बैठका पार पडतील. नव्या हुरूपाने आणि दमाने कामाला लागाल.

वृषभ - कोणत्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या बाजूला ठेवायचा याला आज प्राधान्य द्या. महत्त्वाच्या गोष्टी गडबडीने करायला जाल आणि फाटक्यात पाय अशी आपली अवस्था होईल. काळजी घ्या.

मिथुन - प्रेमाचा रंग गुलाबी असतो. आज असेच गुलाबी रंग भरण्याचा दिवस आपल्या आयुष्यात आलेला आहे. आपल्या प्रियकराला /प्रेयसीला खुश कराल. स्वतःचा आनंद लुटाल. कलाक्षेत्रातही प्रगती आहे.

कर्क - कुटुंबीयांसाठी विशेष कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येकाचा इच्छा, आकांक्षा उंचावलेल्या आहेत. त्या इच्छांचा पाठपुरावा करताना तुमची पुरेवाट होईल हे नक्की.

सिंह - जुने अडकलेले पत्रव्यवहार आज मार्गी लागतील. याच माध्यमातून काही चांगल्या नव्या संधी समोर उभ्या राहतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढीला लागेल आणि इतरांचे स्फूर्ती स्थान बनाल.

कन्या - कुटुंबात आपले वजन राहील. काही नवीन खरेदीचे आज योग आहेत. अक्षय आणि अनंत राहणाऱ्या गोष्टींमध्ये आज गुंतून जाल. वेगळी सकारात्मकता आज जाणवेल.

Horoscope
Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

तूळ - इतरांचा विश्वास संपादन कराल. जिभेवरची गोड बोली आज अशीच राहणार आहे. कुठलेही गोष्टीत संभ्रम नसेल, घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

वृश्चिक - थोडा मनस्तापाचा आज दिवस आहे. ठरवून सुद्धा तशाच गोष्टी होत नाहीत. विनाकारण खर्च वाढेल. तब्येत आजार, कटकटी याच्यासाठी काही पैसे खर्च होतील. मनस्वास्थ्य जपा.

धनु - एखाद्या जुन्या मित्राची आज अचानक भेट होण्याचा दिवस आहे. जुन्या गोष्टींमध्ये रमून जाल. "रम्य ते बालपण" अशाही काही आठवणी येतील. दिवस चांगला राहील .

मकर - कामाच्या ठिकाणी कष्ट आणि मेहनत अधिक करावी लागेल. अर्थात या वाया जाणाऱ्या गोष्टी नाहीत. याचे फळ तुम्हाला निश्चित योग्य स्वरूपात मिळणार आहे. आज आयोजन नियोजन चांगले कराल.

कुंभ - कधी कधी नास्तिकता डोके वर काढते तर कधी अस्तिकता आहे असे वाटते. आज भावनेला प्राधान्य द्याल. तीर्थयात्रा, देवदर्शन अशा गोष्टींमध्ये गुंतून जाल .शनी महाराजांची कृपा विशेष राहणार आहे. कर्म प्रधान रहा.

मीन - धावपळ ही जणू नित्य नियमाची झाली आहे. पण आज धावपळी मधून त्रास होण्याचा संभव दिसतो आहे. स्वभावाला वेगळं फ्रेमिंग करा. आपल्याला इतरांकडून हँडल कोणी करीत नाही ना! याचा विचार करून सजग राहा.

Horoscope
Budh Gochar 2024: 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह करणार गोचर; अडचणी दूर होऊन 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com