Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशींच्या व्यक्तींना आज मिळतील अनेक सुसंधी, संपूर्ण दिवस जाईल मनासारखा

Horoscope Today 22th July 2024 : आज सोमवार आषाढ कृष्णपक्ष. तिथी - प्रतिपदा. राशीचक्रानुसार आज काही राशींच्या लोकांना अनेक सुसंधी मिळतील. संपूर्ण गोष्टी मनासारख्या घडतील, वाचा तुमचे राशीभविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today 22th July 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग - सोमवार दिनांक - २२ जुलै २०२४

आषाढ कृष्णपक्ष. तिथी - प्रतिपदा. नक्षत्र - श्रवण. योग - प्रीति करण - कौलव. रास - मकर. अशून्यश्यनव्रत. दिनविशेष - उत्तमदिवस

मेष : आज अनेक सुसंधी येतील

काम, करिअर यामध्ये आज अनेक सुसंधी येतील. कष्ट व मेहनत आहेच पण त्याबरोबर यश आणि किर्ती सुद्धा मिळेल. प्रवासाचे योग येतील.

वृषभ : मनासारख्या घटना घडणार

नातवंडांचे सौख्य चांगले मिळणार आहे. कलाक्षेत्रामध्ये प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. मनासारख्या घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. भाग्यवृद्धी होईल.

मिथुन : चुकीचे व्यवहार टाळा

आरोग्य जपावे असा असा संदेश आहे. आज विनाकारण मानसिक ताण आणि त्रास वाढवून घेऊ नये. नको त्या भूलथापांचा बळी पडून पैशाशी निगडित चुकीचे व्यवहार आज करू नका.

कर्क : दिवस सुखाचा राहील

कोर्टाची कामे मार्गे लागतील. सर्व ठिकाणी कामाला उत्तम प्रतिसाद मिळेल. मोठ्या काही गोष्टींचे आयोजन कराल. जोडीदाराबरोबर दिवस सुखाचा राहील.

सिंह : त्रासाने भरलेला दिवस

अना, कटकटी, उद्विग्नता आणि त्रास यांनी भरलेला आजचा दिवस आहे. आपण कितीही चांगले वागले तरी वाईट गोष्टींचा ससेमिरा संपणार नाही.

कन्या : आज चांगल्या संधी मिळतील

कलाकारांसाठी दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा सुसंधी मिळतील. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यासाठी दिवस चांगला आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

तूळ : पाहुण्यांची उठबस होईल

घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल. सर्वांशी नाते चांगले राहील. पाहुण्यांची उठबस होईल. दिवस बरा जाईल.

वृश्चिक : पुढे जाण्याचे योग आहेत

आपली ताकद आणि बळ आज आपल्याला समजेल. केलेल्या गोष्टी योग्य आहेत याची खात्री राहील. इतरांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.

धनु : दिवस मनाप्रमाणे असेल

मोठे व्यवहार वडिलोपार्जित गोष्टी याच्या उलाढालीसाठी आजचा दिवस चांगला आहे. पैशाची आवक चांगली राहील. दिवस मनाप्रमाणे असेल.

मकर : शांतपणे सर्व गोष्टी होतील

शांतपणे सर्व गोष्टी होतील. "हाथी चलें अपनी चाल" असा दिवस आहे. सकारात्मकता वाढेल. आरोग्य आणि मानसिकता दोन्ही चांगले राहील.

कुंभ : विनाकारण खर्च टाळा

नको त्या गोष्टींचा त्रास, उद्वेग व त्रागा होईल. घडणाऱ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून बघा. मनस्ताप करून काहीच होणार नाही. विनाकारण खर्च टाळा.

मीन : सून जावयाचे प्रेम मिळेल.

सुखाचे क्षण आणि संधी आज येणार आहेत. त्याचे स्वागत करा. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. ज्येष्ठांशी नाते समृद्ध होईल. सून जावई यांचेही प्रेम लाभेल. आज दिवस छान आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Kumbh Rashi Career : कुंभ राशीचे व्यक्ती असतात अत्यंत बुद्धीमान; नोकरी-व्यवसायात मिळवतात यश, जाणून घ्या राशीबद्दल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com