Horoscope Today : गुरुपुष्यामृताचा योग फलदायी ठरेल, गुंतवणुकीवर अनेक लाभ मिळतील; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

rashi bhavishya today : आज काही राशीच्या लोकांना गुरुपुष्यामृताचा योग फलदायी ठरण्याची शक्यता आहे. तर काहींना गुंतवणुकीवर अनेक लाभ मिळतील.
Horoscope
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

गुरुवार,२४ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष,कराष्टमी,गुरुपुष्यामृत.

तिथी-अष्टमी २५|५९

रास-कर्क

नक्षत्र-पुष्य

योग-साध्य

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - शेतीवाडी बाग बागायती यासाठी असणारे महत्त्वाचे निर्णय आज तुम्ही घ्याल. पाणी, पाणीपुरवठा आड, विहीर, बोअरिंग या निगडित काही गोष्टी करणार असाल तर त्या योग्य वाटेवर आहेत. प्रॉपर्टीशी निगडित अनुकूल घटना घडतील.

वृषभ - पत्रव्यवहार मार्गी लागतील. भावंडांचे विशेष सौख्य आणि प्रेम आपल्याला लाभणार आहे. अनेक दिवस अडकून राहिलेल्या गोष्टी स्वतःच मार्गी लावाल .आणि एक मैलाचा दगड पार पडेल.

मिथुन - सोने खरेदी आणि गुंतवणीसाठी आज गुरुपुष्यामृतासारखा उत्तम योग आहे. पैसे सोन्यामध्ये गुंतवणूक हे तुमच्या पुढील मार्गासाठी, भवितव्यासाठी योग्य गुंतवणूक होईल.

कर्क - मस्त मजेचा आजचा दिवस आहे. स्वैर आणि स्वच्छंदी आयुष्य वाटेल. मनाला वाटणाऱ्या गोष्टींना प्रथम कौल द्याल.आपली सकारात्मकता वाढती राहील.

Horoscope
Chanakaya Niti On Relationship : तुमचीही बायको अशी वागत असेल तर तुमच्यावर येईल वाईट वेळ, आताच सावध व्हा

सिंह -जीवनात येणारे काटे अलगद बाजूला काढावे लागतील. आज तोच दिवस आहे. ठरवल्याप्रमाणे गोष्टी होणार नाहीत त्यामुळे मनस्ताप वाढेल. पण उद्याच्या चांगल्यासाठी आज काही वाईट गोष्टींमधून मार्ग काढणे पर्याप्त आहे.

कन्या - वेगळे काहीतरी करण्याचा वेगळाच आनंद असतो. आज तोच दिवस आहे. विचारपूर्वक निर्णय घ्याल. आधीच्या गुंतवणुकीवर अनेक लाभ मिळत असताना दिसेल असा आजचा दिवस आहे.

तूळ - कामाचा मार्ग व्यापक राहील. मोठे प्रवास कामाच्या दृष्टीने घडतील. अडकून राहिलेल्या अनेक बैठका आज पार पडतील. नवीन दिशा, नवी दालने कामाच्या स्वरूपात खुली होतील.

वृश्चिक- भाग्याचा हेवा वाटेल इतका दिवस हा चांगला जाणार आहे. अर्थात काही गोष्टी ह्या खेचून आणायला लागतात. उपासनेच्या जोरावर आज आपला मार्ग पूर्ण कराल. मनोवांछित घटना होतील. आज गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करावी.

धनु - जोडीदाराकडून धन योगाचे योग दिसत आहेत. त्यासाठी सावरूनच रहा. अचानक धनलाभाची शक्यता आहे. पैशाचा आयुष्यात मोठा असतो हे आज जाणवेल. कष्ट, मेहनत तर आहे पण त्याचा दिलासा सुद्धा मिळेल.

Horoscope
Chanakya Niti: घरात पैसा सतत खेळता राहील; फक्त 'या' पद्धतीने करा दिवसाची सुरुवात

मकर- छोट्या छोट्या गोष्टीत जोडीदाराबरोबर खटके उडत असतील तर आज समेट घडण्याचा आजचा दिवस आहे. एकमेकांच्या सल्ल्याने आणि प्रेमाने पुढे जाल. जीवनातील महत्वाचे निर्णय आपल्या बाजूने लागतील.

कुंभ - आजोळी प्रेम मिळेल. शत्रूंचा त्रास वाढता राहील. तब्येतीच्या तक्रारी सुद्धा वाढतील. संमिश्र असा आजचा दिवस आपल्यासाठी राहील.

मीन - प्रेमामध्ये भावनिक होण्याचा आजचा दिवस आहे. ओथंबून जाणे म्हणजे काय? हे जाणवेल. पैशाच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने आज दिवस छान. गुरुपुष्यामृताचा योग तुम्हाला फलदायी ठरेल. विशेष दत्त उपासना करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com