Rashi Bhavishya : भाग्यकारक घटना घडतील, यश दारात येईल; या राशींसाठी बुधवार सोन्यासारखा, वाचा राशीभविष्य

Horoscope Today 25 September 2024 : आजचे पंचांग - आजचे पंचांग - बुधवार २५ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. वाचा मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today Today 25 September 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग - बुधवार २५ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष.अविधवा नवमी, नवमी श्राध्द. तिथी-अष्टमी १२|१२ पर्यंत नं.नवमी. रास-मिथुन. नक्षत्र-आर्द्रा. योग-वरीयान. करण-कौलव. दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आपल्या स्वभावामुळे घरात किंवा नात्यात मुख्यत्वे करून भावंडांच्या मध्ये आपल्याला वाईट पणा येण्याची शक्यता आहे. सर्वांचे करून सुद्धा कोरडी करवंटी हाती येते की काय असे वाटेल. पण स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून पुढे चला.

वृषभ - प्रेमाचा व्यवहार आज फायदेशीर ठरेल. गोड बोलून घरातील लोकांवर सुद्धा मोहिनी अस्त्र सोडाल. कदाचित यामुळे आपल्या बाबतीत असणाऱ्या पैशाच्या निगडित गोष्टींचा कल आपल्या बाजूने येण्याची शक्यता दाट आहे.

मिथुन - स्वतःवर प्रेम करण्याची कला तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. स्वतःमध्ये मश्गुल राहाल. बोलण्याने इतरांना आपलेसे कराल .एकाच दिवसांमध्ये अनेक चांगले मूड आज तुमच्यामध्ये असतील.

कर्क - जरा लांबचा प्रवासाचे योग दिसत आहेत. यासाठी काही गोष्टींचा आयोजन नियोजन आज कराल. यामध्ये विशेष बैठका होतील आपल्या मताशी कदाचित सगळे सहमत होणार नाहीत त्यामुळे थोडे मतभेद होतील.

सिंह - आपण कधी स्वतःला नीट ओळखलं का आपला स्वभावाचा इतर अनेक जण फायदा घेतात. काही वेळेला मित्र-मैत्रिणी आपल्याला फायद्यासाठी जवळ करतात. आज मित्र-मैत्रिणींबरोबर भेटीचे योग आहेत मात्र तुम्हाला त्यातून समाधान मिळेल.

कन्या - आपल्या बुद्धिमत्तेमुळे आणि कामाच्या एक वेगळ्या हातोटीमुळे आपल्यावर इतर जण खूप छान विश्वास टाकतात. पुढील कामाचे आयोजन नियोजन यासाठी आपला हात कोणीच धरू शकत नाही. वरिष्ठांच्या मर्जीत राहण्याचा आजचा दिवस आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rajyog : दोन राजयोग बदलणार 'या' राशींचं आयुष्य; गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता

तूळ - प्रवासाची आवड आपल्याला मुळातच आहे. आज मात्र कुठेतरी देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा होईल. प्रवास चांगला होईल. मनाला समाधानकारक आणि भाग्यकारक घटना आज घडण्याचा दिवस दिसतो आहे.

वृश्चिक - किती त्रास झाला तरी आज शांतपणे सोसावं लागणार आहे. उगाच बाह्या वर करून काहीही उपयोग होणार नाही. घडणार्‍या गोष्टी घडणार त्यामुळे मनस्ताप करून घेऊन नका. आपल्याविषयी वाईट कोणी पेरेल ते त्यालाच आज भोगावे लागेल.

धनु - इकडे आड तिकडे विहीर असे दोलायमान अवस्था आज होईल. जोडीदार का व्यवसायिक भागीदार या संभ्रमामध्ये राहाल. काम करावे का घरी लक्ष द्यावे अशा गोंधळात दिवस आज जाईल. कामाला प्राधान्य दिल्यास यश दाराशी येईल.

मकर - कनिष्ठानकडून अनादर झेलावा लागेल. कष्ट आणि मेहनत याला पर्याय कधी नसतोच. पण गुप्त शत्रूंचा त्रास सुद्धा आज वाढण्याची शक्यता आहे. दोन हात करून परिस्थितीशी भिडावे लागेल.

कुंभ - संततीकडून सुवर्ता समजतील केलेल्या कष्टांचे चीज झाले आहे हे आज जाणवेल. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. श्राद्धकर्माला प्राधान्य ठेवून कर्म करावीत.

मीन - सुखाची लहरी येईल. घराचे, गाडीचे व्यवहार करणार असाल तर आज त्यामध्ये उजवा कौल दिसतो आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाने सहज एक पाऊल पुढे टाकाल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Surya Grahan 2024 : पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवसावर ग्रहणाचं सावट; 'या' राशींसाठी सूर्य ग्रहण ठरणार अशुभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com