Rashi Bhavishya : या राशींच्या लोकांचे अंदाज अचूक ठरतील, आर्थिक प्रगती होईल; वाचा आजचे राशीभविष्य

Daily Horoscope Today 16 September 2024 : आजचे राशीभविष्य, सोमवार १६ सप्टेंबर २०२४. भाद्रपदशुक्लपक्ष. ईद ई मिलाद. तिथी-त्रयोदशी १५|११. तुमच्या नशिबात आज काय लिहलंय? जाणून घ्या...
तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Daily Horoscope Today Marathi Saam TV
Published On

आजचे पंचांग - सोमवार १६ सप्टेंबर २०२४ भाद्रपदशुक्लपक्ष. ईद ई मिलाद. तिथी-त्रयोदशी १५|११. रास-कुंभ. नक्षत्र-धनिष्ठा. योग-सुकर्मा. करण-तैतिल. दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. बैठकी पार पडतील. नवीन परिचय होतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी यशाची गुढी उभी कराल. अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

वृषभ - तुमच्या कार्यक्षेत्रात माणसांना मान मिळतील. प्रतिष्ठा लाभेल. काही गोष्ट अनेक दिवस रखडलेली असतील तर त्या आज सुकर होतील असे दिसते आहे.

मिथुन - तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरताना दिसत आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. योग्य ते औषधोपचार मिळतील. उपासनेच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

कर्क - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नकोच. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यात अनेक अडचणी उदभवतील. काळजी घ्या.

सिंह - हाती घेतलेल्या कामांमध्ये प्रगती राहील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. काही गोष्टी पटणार नाहीत पण नमते घेऊन आज त्या पूर्ण कराल असे दिसते आहे.

कन्या - मनाला थोडा आराम देण्यासाठी मनोरंजनाकडे कल राहील. शत्रू असतील तर आज त्यांना माफ कराल. गुप्तपणे अनेक गोष्टी कराव्यात अशीच भावना होईल.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Panchak September 2024: उद्यापासून लागणार राज पंचक; या काळात चुकूनही करू नका 'ही' कामं

तूळ - शैक्षणिक क्षेत्रामध्ये हवे तसे यश मिळेल. आर्थिक प्रगती आणि अध्यात्माकडे ओढा या दोन्ही गोष्टींचा सुरेखा संगम दिसून येतो आहे.

वृश्चिक - प्रॉपर्टी निगडित नवीन प्रस्ताव असतील तर त्याला आपल्याकडून होकार दिसतो आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल घरामध्ये मान मिळेल.

धनु - एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण त्यामधून मस्त आत्मविश्वासाने यश मिळवाल. जवळचे प्रवास घडतील..नातेवाईकांचे सहकार्य/ मोलाची मदत मिळेल.

मकर - अचानक धनलाभाची आज शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. कुटुंबीयांचे सहकार्य चांगले राहील. पण एकूण कष्टाचा असा दिवस आहे.

कुंभ - आपण ठरवलेल्या गोष्टी आज सहज घडतील मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभाणारा दिवस आहे. आपल्या मतांविषयी विशेष आग्रही रहाल. सकारात्मकतेचा प्रभाव राहील.

मीन - मोठे प्रवास घडतील. प्रवासाच्या बाबतीत अडचणी येण्याची आज शक्यता आहे.आपल्या साध्या, भोळ्या स्वभावामुळे कोणी आपल्याला फसवणार नाही ना याची काळजी घ्या. आपल्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Grah Gochar 2024: पुढच्या महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचं होणार गोचर; 'या' राशींचे येणार अचानक सोन्यासारखे दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com