
गुरुवार,२० मार्च २०२५ फाल्गुन कृष्णपक्ष,
संत एकनाथ महा.षष्ठी.
तिथी-षष्ठी २६|४६
रास-वृश्चिक
नक्षत्र-अनुराधा
योग-वज्र
करण-गरज
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - छोट्या छोट्या गोष्टीवरून मनाचा उद्रेक होऊ शकतो. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून आज कामे करावी लागतील. धावपळ आणि दगदग असणार आहे. मात्र अचानक धन लाभाची शक्यता दिसते आहे.
वृषभ - आयुष्यामध्ये प्रेम नाही तर जीवन फोल आहे हे आपल्या राशीला नक्कीच समजले आहे. प्रेमासाठी आसुसलेली आपली रास आहे. सहजीवनाची गोडी वाढेल मनासारख्या घटना घडून येतील. कामाच्या नवीन वाटा तयार होतील.
मिथुन - छोट्या त्रासदायक घटना, भुरट्या चोऱ्या होतील. विनाकारण कनिष्ठांकडून अपमान अशा गोष्टींनी भरलेला दिवस आहे. मनाची उभारी शाबूत ठेवावी लागेल.
कर्क - आज संत एकनाथ षष्ठी आहे. नंदा तिथीवर केलेल्या गोष्टीची वृध्दी होते. शिवा उपासना करावी. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी दिवस संधी घेऊन आलेला आहे. संतती सुवार्ता कळतील.
सिंह - घराचे नवीन येऊन योजना आणि बेत आखले जातील. ठरवून दिलेल्या गोष्टी तशाच घडताना दिसतील. कुटुंबीयांमध्ये खेळीमेळीचे वातावरण आणि आनंदि क्षण असतील.
कन्या - वाणी आणि वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल. स्वतःच्या पराक्रमावर बेहद खुश व्हाल. कामाच्या नव्याने वाटा तयार होतील आणि त्यामध्ये यशाची उंची गाठाल. दिवस आनंदी आहे.
तूळ -धनयोगाला छान क्षण आहेत. पैशाची आवक-जावक चांगली राहील. जगायचे कशासाठी तर खाण्यासाठी. आज अशा संधी येऊन जातील. जेवणाच्या पंगती होतील.
वृश्चिक - स्व साठी , स्वास्थ्यासाठी दिवस घालवाल. आपल्या प्रेमामध्येच मशगुल राहणार आहात. अनेक दगडांवर पाय ठेवून काम करण्याची कसरत आज करावी लागेल. पण त्यामध्ये वेगळे समाधान असेल.
धनु- परदेशात जाण्याच्या संधी तयार होतील. पुढील भवितव्यासाठी त्या गोष्टी फायदेशीर सुद्धा ठरतील. थोड्या मनस्तापाचा आजचा दिवस आहे. पण अध्यात्माची कास न सोडता पुढे गेल्यास योग्य वळणावर राहाल.
मकर - जुनी नाती, जुने प्रेम जुनी गुंतवणूक यामधून आज फायदा होईल असे दिसते आहे. प्रगती पाथावर राहाल. अनेक लाभ झाल्यामुळे समाधानाचे क्षण अनुभवाल.
कुंभ - पडद्यामागची भूमिका आज घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत रहाल. कामाची नवीन घोडदौड अनुभवाल. संशोधनात्मक कार्यामध्ये यश मिळेल.
मीन - दत्त उपासना विशेष लाभेल. मोठ्या प्रवासाचे योग आहेत. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.प्रेमामध्ये नव्याने वेगळी उंची गाठाल. दिवस आनंदी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.