Bharat Jadhav
ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक लाभ हवा असेल. समृद्धी मिळवायचा असेल तर काही विशेष उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा करावी. या पूजेसाठी कमळाचे फूल, तांदूळ, मिठाई अर्पण करावी.
वास्तुशास्त्रानुसार तिजोरी नेहमी दक्षिण बाजुच्या भिंतीला लागून ठेवावी. जेणेकरून उत्तर दिशेला तिजोरीचा दरवाजा उघडेल.
गरीब आणि गरजूंना दान करा. यामुळे तुमचे कर्म शुद्ध होते. तसेच संपत्ती मिळविण्याचा मार्ग खुला होत असतो.
उजव्या हातात गुलाबी किंवा लाल रंगाचा रेशमी धागा बांधा. लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.
घरात चांदीचा हत्ती ठेवल्यानं सुख-समृद्धी येत असते. तसेच वास्तूदोष देखील दूर होत असतो.
कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र घरात ठेवा आणि रोज त्याची पूजा करा