Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, गुरुपौर्णिमेला जुळून आला खास योग; या राशींच्या व्यक्तींना येणार अच्छे दिन

Horoscope Today 21 July 2024 : गुरुपौर्णिमेला अनोखा योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. जाणून घ्या तुमचे राशीभविष्य...
आजचे राशी भविष्य
Horoscope Today 21th July 2024Saam TV
Published On

दैनिक पंचांग - रविवार दिनांक - २१ जुलै २०२४

आषाढ शुक्लपक्ष. तिथी - गुरुपौर्णिमा. नक्षत्र - उत्तराषाढा. योग- विष्कंभ. करण - बव. रास - मकर. दिनविशेष - व्यासपूजा. चांगला दिवस.

मेष : मनोबल चांगले राहील.

ज्ञान घेतानाच गुरु मार्गावरूनच चालणं हे पर्याप्त असते. म्हणूनच आज आपण ज्यांच्याकडून ज्ञान घेतले आहे त्यांना स्मरून कामांमध्ये जीव ओतून मेहनत केली तर दिवस खूप छान क्षण घेऊन येणार आहे. प्रवास होतील. मनोबल चांगले राहील.

वृषभ : मोठे प्रवास होतील.

"गुरुविण कोण दाखवील वाट"! असा आज दिवस आहे. गुरुपौर्णिमेची विशेष उपासना आपण केल्यास पुढील काही कालावधीचे उत्तम पुण्य आपल्याला मिळेल. चंद्र व गुरू यांची उपासना करा. मोठे प्रवास होतील. मन प्रसन्न राहील .

मिथुन : शरीर आणि मनस्वास्थ्य जपा

"परिस्थितीशी दोन हात आज आपल्याला करावे लागतील" वाटेमध्ये असणारे काटे आपल्यालाच उचलावे लागतील. विनाकारण कोणी येऊन आपल्याला मदत करेल याची अपेक्षा करू नका. शरीर आणि मनस्वास्थ्य जपा.

कर्क : व्यवहार मार्गी लागतील

खूप काम धावपळीचा आणि प्रवासाचा आजचा दिवस आहे. काम असणे ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्याकडून नेटाने अनेक कामे पूर्ण होतील. काही व्यवहार मार्गी लागतील. दिवस आनंदाचा असेल.

सिंह : दुखणी डोके वर काढतील.

मीपणा सोडून राहिल्यास दिवसाचा आनंद घ्याल. अन्यथा इतरांना हुकूमत गाजवल्यास काही गोष्टी आपल्या अंगलट येतील. तब्येत, आजार, दुखणी अशा कटकटी डोके वर काढतील. काळजी घ्या.

कन्या : घटना मनासारख्या घडतील

गुरु सेवा करण्यासाठी आजच्या दिवसासारखा दिवस नाही. उपासना करा. देवदर्शन, जप जाप्य यामध्ये वेळ व्यतीत करा. अनेक गोष्टी धनाशी निगडित असतील तर त्याचे आज विशेष आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत. घटना मनासारख्या घडतील. कला, मनोरंजन यात दिवस व्यतीत होईल.

आजचे राशी भविष्य
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

तूळ : मनस्थिती द्विधा राहील

"असेल तर असेल नसेल तर नसेल" अशा थोड्या बेदरकारीत आज तुम्ही राहाल. अर्थात काही वेळा याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. सर्वांना घेऊन बरोबर जाण्याचे विचार येतात पण ते तसं होईलच याची शाश्वती नसते. मनस्थिती द्विधा राहील.

वृश्चिक : छोटे प्रवास घडतील

मीपणा थोडा डोके वर काढेल. पण केलेल्या गोष्टींमध्ये यश येईल. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पत्रव्यवहार मार्गे लागतील. छोटे प्रवास घडतील.

धनु : भक्तीमध्ये मन व्यक्तीत होईल.

गुरू महाराजांची विशेष कृपा आपल्यावर आज राहणार आहे. पैशांची आवक त्यामुळे वाढती राहील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा त्याचा फायदा होईल. कुटुंबीयांबरोबर दत्तभक्ती मध्ये मन व्यक्तीत होईल.

मकर : सुसंधी येईल त्याचे सोने करा

ठरवूनच काही गोष्टी करायला लागतात. त्यातील आजचा आपला दिवस आहे. सुसंधी येईल आणि त्याचे सोने करा. न बोलता काम करून सकारात्मक राहण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ : उपासना तुम्हाला बळ देईल

मनाचा कोपरा जरा रीताच राहील. यासाठी उपासना तुम्हाला बळ देईल. मनस्वास्थ्य खराब ठेवू नका. अनेक गोष्टीत अडचणी येतील आणि व्यर्थ खर्च सुध्दा होईल. मात्र दानधर्म कराल.

मीन : कामांमध्ये सहकार्य लाभेल

आज भोळेपणावर मात कराल असे दिसते आहे. सर्वांना घेऊ मार्गक्रमण कराल. नातेवाईकांचे कामांमध्ये सहकार्य लाभेल. दिवस आनंद घेऊन आलेला आहे. त्याचे स्वागत करा.

आजचे राशी भविष्य
Kumbh Rashi Career : कुंभ राशीचे व्यक्ती असतात अत्यंत बुद्धीमान; नोकरी-व्यवसायात मिळवतात यश, जाणून घ्या राशीबद्दल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com