Numerology: आपल्या जोडीदाराशी प्रेमाने वागतात 'या' तारखेला जन्मलेले लोक; कधीही करत नाहीत लबाडी

Numerology: अंक ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख जाणून घेऊन त्याचे भविष्य जाणून घेता येते.
Numerology
Numerologyyandex

Numerology : ज्योतिषशास्त्राच्या शाखांमध्ये अंकशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीचे भविष्य कळत असते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख पाहून त्याचे भविष्य सांगता येते. कारण एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ही मूलांकाशी संबंधित असते. प्रत्येक मूलांक संख्या निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. त्या ग्रहांच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याविषयी माहिती मिळू शकते. आपण जाणून घेऊन की, कोणत्या जन्मतारखेचे लोक आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिक आणि निष्ठावान राहतात.

प्रेमात असतात निष्ठावान आणि प्रामाणिक

अंकशास्त्रानुसार ६ तारीख असलेले लोक प्रेमाच्या बाबतीत आपल्या जोडीदाराशी अधिक निष्ठावान आणि प्रामाणिक असतात. जोडीदाराशी पूर्ण प्रामाणिकपणाने संबंध ठेवतात. या लोकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे कोणावरही सहजासहजी रागावत नाहीत. या लोकांच्या स्वभाव रागीट नसतो.

पण जेव्हा एखाद्याला राग येतो तेव्हा ते खूप धोकादायक ठरत असते. ६ जन्म तारीख असलेले लोक आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात. हे लोक त्यांच्या साथीदाराची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात. जे लोक विवाहित आहेत ते त्यांचे वैवाहिक संबंध पूर्ण निष्ठेने आणि अंतःकरणाने टिकवून ठेवतात. ज्या लोकांची जन्मतारीख ६, १५ आणि २४ आहे, ते त्यांच्या जोडीदाराला कधीच फसवत नाहीत.

अंकशास्त्रानुसार ६ जन्मतारीख असलेले लोक कला आणि संगीताचे मोठे प्रेमी असतात. सहा जन्म तारीख असलेल्या लोकांना चांगले कपडे घालणे खूप आवडते. या लोकांना नेहमी विलासी जीवन जगणे आवडते.हे लोक कोणत्याही परिस्थितीशी फार लवकर जुळवून घेतात आणि मैत्री जपण्यातही ते पटाईत असतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Numerology
Budh Margi: बुध ग्रहाचं संक्रमणाने 'या' तीन राशींवर होणार परिणाम; शिक्षण आणि व्यवसायात होईल भरभराट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com