Budh Margi: बुध ग्रहाचं संक्रमणाने 'या' तीन राशींवर होणार परिणाम; शिक्षण आणि व्यवसायात होईल भरभराट

Rashi : बुधला ग्रहांचा राजकुमार, बुद्धिमत्ता, भाषण, व्यवसाय, मनोरंजन आणि भौतिक सुख देणार ग्रह मानतो. पण बुध ग्रह थोडे अस्थिर आहेत, कारण त्यांचा वेग खूप वेगवान आहे. चंद्र आणि केतू वगळता इतर सर्व ग्रह त्यांचे मित्र आहेत
Budh Margi
Budh MargiPunjabkesari

Budh Margi: बुधला ग्रहांचा राजकुमार, बुद्धिमत्ता, भाषण, व्यवसाय, मनोरंजन आणि भौतिक सुख देणार ग्रह मानतो. पण बुध ग्रह थोडे अस्थिर आहेत, कारण त्यांचा वेग खूप वेगवान आहे. चंद्र आणि केतू वगळता इतर सर्व ग्रह त्यांचे मित्र आहेत किंवा त्यांना कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. ते विशेष म्हणजे सूर्याच्या जवळ असल्याने सूर्यास्त झाल्यानंतरही बुधचा प्रभाव पजत असतो.

ज्या लोकांच्या कुंडलीत बुध शुभ स्थितीत असतो, त्यांना आपोआप धन, सुंदर स्त्री, सुख, भोग इत्यादी विशेष लाभ मिळतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीवर बुध ग्रह कृपा करतो त्याला जगातील सर्व सुख प्राप्त होते. दरम्यान २५ एप्रिल २०२४ पासून बुध ग्रहाचं संक्रमण झालं असून त्याचा या राशींवर थेट बुधाची विशेष कृपा असणार आहे.

मेष

बुध ग्रहाच्या संक्रणामुळे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या संपण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि मार्ग सापडतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी पैशाचा ओघ मजबूत असेल. या राशीतील काही विद्यार्थ्यांची अभ्यासाकडे आवड वाढेल आणि अभ्यासासाठी चांगले वातावरण असणार आहे. वरिष्ठ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. परीक्षेत चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

या राशीच्या लोकांचा वेळ मौजमजा आणि मनोरंजनात व्यतीत होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींचे कामे रखडलेली आहेत ते कामे पूर्ण होतील. ज्या लोकांचा पैसा कोणाकडे अडकला असेल तर त्याच्या पैसा मिळण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही त्यांचे अभ्यासात मन लागले. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जे लोकांचा व्यवसाय आहे, त्यांना त्यांच्या व्यवसायात चांगला फायदा होईल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांची बेरोजगारी संपण्याची शक्यता आहे. काही लोकांना त्यांच्या नोकरीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल. राजकारणाशी निगडित असलेल्या लोकांना पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण व्यवसायाशी संबंधित लोक मालामाल होतील. ज्या लोकांचा कोचिंगचा असेल किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणारे असतील त्याचे त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Budh Margi
Shukra Asta 2024: 28 एप्रिलला शुक्र होणार अस्त, या 3 राशींचे भाग्य चमकणार; मिळणार आनंदाची बातमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com