Shukra Asta 2024: 28 एप्रिलला शुक्र होणार अस्त, या 3 राशींचे भाग्य चमकणार; मिळणार आनंदाची बातमी

Horoscope Rashi Bhavishya: धन, वैभव, कीर्ती आणि आनंद देणारा शुक्र 24 एप्रिल रोजी रात्री 11:44 वाजता मेष राशीत प्रवेश करत आहे. यानंतर 28 एप्रिल रोजी सकाळी 7.27 वाजता मेष राशीत अस्त होणार आहे.
Shukra Asta 2024
Shukra Asta 2024Saam Tv

Shukra Asta 2024:

धन, वैभव, कीर्ती आणि आनंद देणारा शुक्र 24 एप्रिल रोजी रात्री 11:44 वाजता मेष राशीत प्रवेश करत आहे. यानंतर 28 एप्रिल रोजी सकाळी 7.27 वाजता मेष राशीत अस्त होणार आहे. ज्याचा 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. मात्र याचा काही राशींना चांगलाच फायदा मिळणार आहे.

शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या 3 राशींना खूप शुभ परिणाम मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. भौतिक सुख-सुविधा वाढतील आणि जीवनात आनंद येईल. कोणत्या होते या तीन राशी हे जाणून घेऊ...

Shukra Asta 2024
Surya Rashi Parivartan: 13 मे पर्यंत या राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा, सगळ्या अडचणी होणार दूर

मिथुन

करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. पैसे वाचवण्याच्या नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात विस्तार होईल. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती कराल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

कन्या

28 एप्रिलला शुक्र अस्त झाल्यानंतर कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. पैशाच्या प्रवाहाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अचानक आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. उत्पन्न वाढेल. अविवाहितांचा जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल.

Shukra Asta 2024
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २६ एप्रिल २०२४ मेषसह ५ राशींच्या लोकांनी आज 'या' चुका टाळा

मकर

मकर राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढीच्या नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. पैशाची आवक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहील. कार्यलयात आनंदच वातावरण राहील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com