Numerology: नव-नवीन योजनांवर काम करतात 'या' तीन तारखांना जन्मलेले लोक,प्रत्येक गोष्टीत मिळतं यश

Numerology: अंकशास्त्रानुसार विशिष्ट मूलांकाच्या 3 तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन योजना बनवण्यात आणि कामाची अंमलबजावणी करण्यात निपुणता असते. विशेष म्हणजे त्या कामात त्यांना यशदेखील मिळत असते.
Numerology
Numerologygoogle
Published On

अंकशास्त्र हे एक आकर्षक विज्ञान आहे. येथे मूक संख्या केवळ बोलकी बनली नाही तर एखाद्या व्यक्तीची अज्ञात आणि लपलेली रहस्येदेखील सर्वांसमोर येत असते. संख्येवरून समोरील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य सांगितलं जातं. म्हणूनच आज अंकशास्त्राला प्रचंड लोकप्रियता मिळालीय. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येमागे एक विशेष ऊर्जा आणि दडलेले असते याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.

अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. मूलांकाला लाइफ पाथ नंबर देखील म्हणतात. जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश आणि दिशा स्पष्ट करत असते. मूलांक व्यक्तीची जन्मतारीख जोडून त्याची गणना केली जाते. दरम्यान आज अशा लोकांविषयी माहिती दिली जाणार आहे, जे नवीन योजना बनविण्यात आणि कार्याची अंमलबजावणी करण्यात निपुण असतात. ते एका विशिष्ट मूलांकाच्या ३ तारखांशी संबंधित आहेत.

Numerology
Shani Dev Favourite Zodiac: शनिदेवाला या 3 राशी आहेत खूप प्रिय, शनीच्या कृपेने आयुष्यात येते भरभराट

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक संख्या ५ असते. या मूलांकाचा शासक ग्रह बुध आहे. या रॅडिक्स नंबरच्या या ३ विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांवर त्यांच्या शासक ग्रहाचा जोरदार प्रभाव असतो. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, संवाद, व्यवसाय, मैत्री इत्यादींचा स्वामी आणि नियंत्रक मानला जातो.

Numerology
Love Rashifal: 12 राशीतील 'या' ५ राशी असतात 'प्रेम दर्दी'; आयुष्यात कधीच मिळत नाही खरं प्रेम

भरपूर असतो पैसा

अंकशास्त्रामध्ये बुध ग्रह केवळ वाणी आणि बुद्धिमत्तेसाठीच नाही तर संपत्ती आणि सुविधांसाठी देखील मानला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या लोकांचा जन्म गरीब आणि मागास कुटुंबात झाला असला तरी त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची आर्थिक स्थिती बहुतेक वेळा चांगली असते.

नवीन गोष्टी करायला खूप आवडतात

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक ५ चे लोक अत्यंत बुद्धिमान आणि मेहनती असतात. नवीन योजना बनवण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांना नैपुण्यता असते. नवीन गोष्टी करणे आणि त्या पुर्णत्वास नेण्यात ते निपुण असतात. हे त्यांच्या आवडत्या कार्यांपैकी एक असते. अगदी गुंतागुंतीचे प्रश्नही सोडवण्याची क्षमता त्यांच्यात असते.

पराभव स्वीकारत नाहीत

मूलांक ५ चे लोक जे काही ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या ठरवलेल्या कामात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी हे लोक शेवटपर्यंत हार मानत नाहीत. अपयश आल्यावर ते निराश होत नाहीत, तर ते अपयशाचे कारण शोधून ते यशस्वी होतात.

व्यवसाय, आर्थिक लाभ, मैत्री आणि भागीदारीसाठीही बुध जबाबदार ५व्या क्रमांकाचे लोक जर एखाद्या व्यवसायात सामील झाले किंवा व्यवसाय भागीदार बनले तर ते नेहमीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी करत असतात. पैसे व्यवस्थितपणे हाताळण्यात आणि गुंतवण्यात ते अतिशय कार्यक्षम असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com