Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात खूपच भाग्यवान; अंकशास्त्रानुसार तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या...

Numerology Tips in Marathi : ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला झाला असेल त्यांचा भाग्यांक सात आहे. हा अंक नेपच्यून ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे.
 Numerology Tips in Marathi
Numerology Tips in MarathiSaam TV
Published On

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला झाला असेल त्यांचा भाग्यांक सात आहे. हा अंक नेपच्यून ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे. तुमचे व्यक्तिमत्व मुलत: स्वतंत्र आहे. स्वतःचे निसर्ग प्रेम, प्रकृती निसर्गतः अस्वस्थ असते. दूरच्या देशाबद्दल आवड असून काही ना काही निमित्ताने परदेशाशी संबंध येतो. धर्मविषयक ,रूढी आणि चमत्कारी कल्पना असतात.

ठराविक चाकोरीतून जाणे आवडत नाही. हा ग्रह अध्यात्मिक तत्वाचा आहे त्यामुळे उच्च कोटीचा अहंकार आहे. वैयक्तिक रित्या अनेक गोष्टी जोपासता. पक्षाप्रमाणे स्वैरवर्तन असते. परंपरा आणि रूढी बद्दल तिरस्कार असतो. मोठे भविष्यवाणी आणि अध्यात्मवादी या अंकावर असू शकतात. तुमची वागणूक अनेकदा गोड असते. तर विचार करून मोठ्या प्रमाणात ध्येयपूर्ती होते.

 Numerology Tips in Marathi
Numerology Number 3 : या तारखांना जन्मलेले व्यक्ती आयुष्यात मिळवतात मोठं यश; तुमचा भाग्यांक कोणता?

काही वेळेला दुराग्रही आणि दुसऱ्यांच्या मताची उपेक्षा केले जाते. पैसा मिळवण्याची कला मुळातच अवगत आहे. उदास आणि बेफिकीर वृत्तीचे असतात. चांगल्या गोष्टींचीच फक्त निवड करता भावनाप्रधान असूनही मूळ भावना लपवण्याकडे कल असतो. सर्वसाधारण विचारसरणीच्या आणि सामान्य लोकांच्या मध्ये मिसळणे रुचत नाही. आपल्याला सतत बदल हवा असतो.

आवडत्या पुस्तकांबद्दल आपल्याला वेळ काढणे. आवडते स्वतःचे ज्ञान अधिकाऱ्याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. सल्ला विचारास तुम्ही अधिकार पणे आणि खंबीरपणे देऊ शकता. शांतता प्रिय असून कष्टाची कामे आवडत नाहीत. स्वभाव विनोदी असतो. अनाठही खर्च त्याच्यावर निर्बंध घालू शकता. मनामध्ये बंड करण्याची वृत्ती उफाळून येते.

बोलण्यात आणि वागण्यातून फरक जाणवतो. स्वभाव आनंदी आणि उत्साही आहे परंतु अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनेच्या भरात निर्णय घेता. तुमच्या वागण्यामधून इतरांना स्फूर्ती मिळते. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर -अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या उपलब्ध आहेत.

 Numerology Tips in Marathi
Numerology Number : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात अत्यंत भाग्यवान; कोणत्याही क्षेत्रात मिळवतात यश

त्यामध्ये साधारण परदेशाशी निगडित गोष्टी तेथील मालाची ने आण या व्यवसायात यश मिळते. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण इतर केमिकलचे व्यवसाय यशस्वी होतील. वैद्यकीय क्षेत्रामध्ये चमकू शकाल. रोग आजाराचा विचार केला तर तुमचे आजारचे मुख्यत: कारण मनावरील ताण.

तुमचे सर्व आजार थकलेल्या मनामुळे होतात. सदोष रक्ताभिसरण, पोटाच्या तक्रारी, ताप वरचेवर होतात परीश्रम आणि मनावरील दडपण यापासून दूर राहणे गरजेचे आहे. आपले कामाचे त्रास आणि विश्रांतीच्या वेळाची योग्य ती सांगड घातल्यास या सर्व गोष्टी टाळू शकता.

 Numerology Tips in Marathi
Chandra Grahan 2024: चंद्र ग्रहणाला बनणार अद्भुत संयोग; 'या' राशींना अचानक मिळणार बंपर लाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com