Numerology Prediction: मूलांक ७ असलेल्यांसाठी पुढचं वर्ष ठरेल चमत्कारिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात होणार मोठा बदल

Numerology Prediction 2026: पुढील वर्ष २०२६ मूलांक ७ अंक असलेल्यांसाठी खूप लाभकारी ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. करिअर, पैसा आणि प्रेमाच्या बाबतीत ७ क्रमांक असलेल्यांसाठी २०२६ हे वर्ष कसे असेल ते सविस्तरपणे जाणून घ्या.
Numerology Prediction 2026:
Mulank 7 people will experience major transformation and success in 2026, as per numerology predictionssaam tv
Published On
Summary
  • मूलांक ७ साठी 2026 हे भाग्यवर्धक आणि चमत्कारीक ठरणार आहे.

  • करिअरमध्ये मोठी संधी, प्रमोशन आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता

  • प्रेमसंबंध मजबूत होतील, विवाह योग जुळण्याची शक्यता आहे.

कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. मूलांक ७ चा अधिपती केतू आहे. केतू हा एक छाया ग्रह मानला जातो जो आध्यात्मिक विकास, अलिप्तता, मोक्ष आणि आध्यात्मिक ज्ञानाशी संबंधित आहे. पुढील वर्ष २०२६ मूलांक ७ अंक असलेल्यांसाठी खूप चमत्कारीक ठरणार आहे. केतुच्या प्रभावाखाली, ७ मुलांकाचे लोक आध्यात्मिक, अंतर्मुखी आणि खोल विचार करणारे असतात. ते कठोर परिश्रम करतात आणि शिस्तबद्ध राहतात, ज्यामुळे त्यांना उत्तम यश मिळते.

Numerology Prediction 2026:
Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नवीन वर्ष मूलांक ७ अंतर्गत जन्मलेल्या व्यावसायिकांसाठी खूप मेहनत घेऊन येईल. कठोर परिश्रम करूनही तुमचा व्यवसाय चढ-उतार होत राहिला तर निराश होऊ नका. हे अनुभव भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक परिस्थिती सामान्य राहण्याची शक्यता आह. चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते. तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत असाल. पण धोकादायक गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात कठोर परिश्रम करत राहावेत, तरच त्यांना यश मिळेल.

Numerology Prediction 2026:
Shukra Gochar 2026: १०० वर्षांनी शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार समसप्तक राजयोग; पैसे मिळवून 'या' राशी जगणार ऐशोआरामात आयुष्य

प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवन कसं असणार?

अंक ७ मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत वेळ घालवतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, कठोर बोलून कोणालाही दुखवू नका. अविवाहितांनी लग्नाची घाई करणे टाळावं. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. तर २०२६ हे वर्ष ७ मूलांक असलेल्या लोकांसाठी शारीरिक समस्यांसह ताणतणाव आणणारे असेल. तुम्हाला हाडांच्या समस्या, दातदुखी आणि वजन वाढणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पाण्याशी संबंधित आजार संभवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com