Tuesday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, 5 राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : नशिबाची साथ, करिअर-व्यवसायात प्रगतीच्या संधी, मान-सन्मानात वाढ; चाणक्य नीतीतून लग्नाविषयी सावध इशारा.
Horoscope
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल आणि आत्मविश्वास मजबूत राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

वृषभ : आरोग्याची विशेष काळजी घ्या. हट्टीपणा आणि अहंकार टाळल्यास कामे सुरळीत होतील. कुटुंबीयांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.

मिथुन : नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क : कामाचे योग्य नियोजन करून पुढे जा. सकारात्मक विचारांमुळे अनेक अडचणी दूर होतील. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवा.

सिंह : मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होतील. संतानाकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

Horoscope
Chanakya Niti : भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय नका घेऊ; नाहीतर डोक्याला मारावा लागेल हात

कन्या : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. राग किंवा घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. घर आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

तुळ : सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. नवीन संपर्कांमुळे लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गोड बोलण्यामुळे नवीन संधी मिळू शकतात.

धनु : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नवीन कल्पना यश मिळवून देतील.

मकर : परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल. कामात निष्काळजीपणा करू नका. नियमांचे पालन केल्यास यश मिळेल.

Horoscope
Ladki Bahin Yojana : ई-केवायसीनंतरही ₹1500 चा हप्ता मिळाला नाही? लाडक्या बहिणींना अदिती तटकरेंनी दिली मोठी खुशखबरी

कुंभ : व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल आणि जुने अडथळे दूर होतील. कामात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

मीन : महत्त्वाच्या कामांवर तुमचे नियंत्रण राहील. करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com