Lunar Eclipse Horoscope: चंद्रग्रहण आणि होळी एकत्र, जाणून घ्या 12 राशींवर काय होईल परिणाम?

Holi Horoscope 2024: चंद्रग्रहण अनेक राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. जाणून घेऊया वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होईल...
Lunar Eclipse Horoscope
Lunar Eclipse HoroscopeCanva

Lunar Eclipse Horoscope 2024:

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशींमध्ये होणारे बदल, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण खूप महत्त्वाचे मानले जाते. अशी मान्यता आहे की, याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. ग्रहणाच्या प्रभावामुळे जीवनात अनेक मोठे बदल घडतात.द्रिक पंचांगानुसार, 2024 सालचे पहिले चंद्रग्रहण 25 मार्च रोजी होणार आहे. हिंदू धर्मात सुतक काळापासून ते ग्रहण या काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

या काळात केलेल्या कामाचा पुढे वाईट परिणाम होतो, असे म्हणतात. यावेळी होळी चंद्रग्रहणाच्या दिवशीच येत आहे. मार्च महिन्यात होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधीही वैध राहणार नाही आणि लोकांना आनंदात होळी साजरी करता येणार आहे. यातच हे चंद्रग्रहण अनेक राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. जाणून घेऊया वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होईल...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lunar Eclipse Horoscope
Holi Horoscope 2024: होळीत 'या' 5 राशींचे नशीब फळफळणार! चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे होईल लाभ

मेष : सकारात्मकता, प्रामाणिकपणा आणि विचारांमधील स्पष्टता ही तुमची ताकद बनेल आणि तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आयुष्यात नवीन गोष्टींचा शोध घ्याल. नात्यात जवळीक वाढेल. प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील.  (Latest Marathi News)

वृषभ : दीर्घकाळ चाललेल्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. जीवनात उर्जा आणि उत्साह भरलेला असेल. यशाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

मिथुन : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील. मानसिक शांती मिळेल. विचारांमध्ये स्पष्टता येईल. गोंधळाची परिस्थिती दूर होईल. तुम्हाला नकारात्मकतेपासून मुक्ती मिळेल. नवीन बदल स्वीकारण्यास तयार रहा.

कर्क : आयुष्यात आव्हाने वाढतील, पण संयम ठेवा. समजूतदारपणे समस्या सोडवा. निरुपयोगी विचार टाळा. शांत मनाने निर्णय घ्या.

सिंह : चंद्रग्रहणानंतर सिंह राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. करिअरमध्ये यशाचा मार्ग सुकर होईल. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील.

कन्या : मिथुन राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे भाग्याची साथ मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी नवीन प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Lunar Eclipse Horoscope
Navpancham Rajyog : 26 मार्चला नवपंचम राजयोगामुळे या 3 राशीचे लोक बनतील श्रीमंत, सगळी संकटं होणार दूर

तूळ : आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा. नवीन कौशल्ये शिका. लेखन आणि वाचनात वेळ घालवा. यामुळे जीवनात प्रगतीच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. जीवनात अनेक चढ-उतार येतील. मात्र तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. आगामी काळात होणारे बदल हे प्रगतीची संधी मानून पुढे जात राहा.

धनु : या काळात तुम्ही तुमची स्वप्ने साकार करण्यात यशस्वी व्हाल. ग्रहणामुळे वाढती आव्हाने असली तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मकर : जीवनात अनिश्चितता राहील. मात्र ग्रहणाच्या प्रभावामुळे नशीब तुमच्या बाजूने राहील. तुमचा विश्वास आणि मेहनत घेऊन तुम्ही आव्हानांवर मात करू शकाल. प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल.

कुंभ : महत्त्वाचे बदल होण्याची चिन्हे आहेत. मेहनतीचे फळ मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

मीन : जीवनात नवीन चमत्कारिक बदल घडतील. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन लोकांशी भेट होईल. व्यक्तिमत्व सुधारेल. कमाईचे नवीन मार्ग तयार होतील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com