Love Horoscope: प्रेमी युगुलांसाठी कसा असेल सोमवारचा दिवस, शोभन योगचा प्रेम जीवनावर कसा पडेल प्रभाव?

Love Horoscope: सोमवारी शोभन योग तयार होतोय. हा योग 10 मार्च 2025 रोजी 12 राशींच्या प्रेम जीवनावर परिणाम करेल. हा योग तुमच्या लव्ह लाईफसाठी शुभ ठरेल की नाही हे जाणून घेऊ.
Horoscope
Horoscopesaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रामध्ये शोभन योगाचे खूप महत्त्व आहे. या योगात पूजा केल्यानं साधकाला मोठा फायदा होत असतो. विशेष करून वैवाहिक जीवन जगणाऱ्यांना मोठा लाभ मिळत असतो. वैदिक पंचांगानुसार 10 मार्च 2015 ला फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशी आहे. यासह शोभन योग निर्माण होत आहे. शोभन योगचा तुमच्या लव्ह लाईफवर परिणाम होणार आहे. हे जाणून घ्यायचे असेल तर 10 मार्च 2025 चे राशीभविष्य वाचा.

मेष

मेष राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनावर शोभन योगाचा शुभ प्रभाव पडणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने बोलणे चांगले वाटेल आणि मानसिक ताणही कमी होईल. अविवाहित लोकांना प्रेमात यश मिळू शकते.

शुभ रंग- भूरा

शुभ अंक- 8

वृषभ

या राशीच्या लोकांना शोभन योग समृद्धी आणि आनंद देणारा आहे. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद संपतील. जोडप्यांमधील परस्पर प्रेम वाढेल. जे अविवाहित त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे, त्यांच्या जीवनात प्रेमाची एंट्री होणार आहे.

शुभ रंग- गुलाबी

शुभ अंक- 2

मिथुन

अविवाहित लोक त्यांच्या सोबतीची वाट पाहत राहतील. त्याचवेळी, विवाहित किंवा प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा दिवस चांगला नाहीये. जर तुम्ही आधीच कुठेतरी जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर तो रद्द होण्याची शक्यता आहे.

शुभ रंग- गुलाबी

शुभ अंक- 9

कर्क

शोभन योगाच्या शुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात स्थिरता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. जे अविवाहित आहेत, त्यांच्या आयुष्यात सोमवारी प्रेमाची एंट्री होईल.

शुभ रंग- हिरवा

शुभ अंक- 7

सिंह

ग्रहांच्या विशेष आशीर्वादामुळे अविवाहित लोकांना त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळेल. दाम्पत्यांसाठी हा दिवस सामान्य असणार आहे. तर काही लोकांना त्यांच्या साथीदारांवर राग येण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामात व्यस्त असेल, ज्यामुळे तो तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही.

शुभ रंग- नारंगी

शुभ अंक- 1

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस अविस्मरणीय असणार आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला खरेदीला घेऊन जाऊ शकतो. याशिवाय सोमवारी तुम्ही बाहेर डिनरही कराल.

शुभ रंग- काळा

शुभ अंक- 9

तूळ

भूतकाळात तुमचे तुमच्या सोबत्याशी भांडण झाले असेल तर त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात लव्ह लाईफशी संबंधित कोणतेही मोठे पाऊल उचलू नका. नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. अविवाहित लोकांना सोमवारी प्रेमात यश मिळणार नाही. त्यामुळे आज कोणीही प्रपोज करू नका.

शुभ रंग- हिरवा

शुभ अंक- 6

वृश्चिक

प्रेमसंबंध आणि विवाहित लोकांचा दिवस सामान्य जाईल. जोडीदारासोबत वेळ घालवता येणार नाही. जे अविवाहित आहेत, त्यांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येईल.

शुभ रंग- पिवळा

शुभ अंक- 10

धनु

घरात तुमच्या लग्नाची चर्चा सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला लवकरच चांगली बातमी कळू शकते. दाम्पत्यांसाठी हा दिवस चांगला असेल. सोलमेट तुमच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करेल. तुमच्याशी मोकळेपणाने गप्पा करेल.

शुभ रंग- नारंगी

शुभ अंक- 3

मकर

या राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस प्रेमाच्या दृष्टीने चांगला राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकांतात बोलाल, यामुळे तुम्हाला त्याला समजून घेण्याची संधी मिळेल. जे अविवाहित आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून खास व्यक्तीशी बोलू शकतात.

शुभ रंग- नारंगी

भाग्यवान क्रमांक - 7

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी यावेळी लग्न करणे योग्य ठरणार नाही. तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. विवाहितांसाठी हा दिवस चांगला राहील. मित्रांसोबत एकांतात वेळ घालवाल. तुम्हाला खास वाटण्यासाठी तुमचा पार्टनर तुम्हाला शॉपिंगसाठी घेऊन जाऊ शकतो.

शुभ रंग - पिवळा

भाग्यवान क्रमांक - 4

मीन

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा ठरणार आहे. संपूर्ण दिवस खराब राहणार आहे. चीड-चीड होईल. तुमच्या जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. जे लोक प्रेमाची प्रतिक्षा करत आहेत त्यांना प्रेम मिळणार नाही.

शुभ रंग - पांढरा

शुभ अंक- 8

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com