Guru Gochar 2025: दिवाळीला झालं गुरु ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' ३ राशींवर सणाला बरसणार पैसा

Diwali Guru Gochar 2025: ज्योतिष शास्त्रानुसार २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीचा सण आहे आणि या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२५ रोजी देवगुरु बृहस्पती अत्यंत महत्त्वाचा राशी बदल करत आहे.
Guru Gochar
Guru Gocharsaam tv
Published On

या वर्षी २० ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जात आहे आणि दिवाळीच्या एका दिवस आधी म्हणजे १९ ऑक्टोबरच्या रात्री देवगुरू बृहस्पती कर्क राशीत अतिचारी अवस्थेत प्रवेश करणार आहेत. या राशीत बृहस्पती ११ नोव्हेंबरपर्यंत वक्री राहतील आणि नंतर ३ डिसेंबरला मिथुन राशीत गोचर करतील.

ज्योतिषशास्त्रानुसार, अतिचारी अवस्थेत बृहस्पतीचा आपल्या उच्च कर्क राशीत येणं अनेक राशींच्या लोकांसाठी लाभाचे योग निर्माण करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Guru Gochar
Navpancham rajyog: 30 वर्षांनंतर बनणार नवपंचम राजयोग; 'या' राशींवर राहणार शनी-सूर्याची कृपा, मिळणार पैसाच पैसा

मेष रास

नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जे शुभ क्षण खूप दिवस वाट पाहत होता, तो लवकरच येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. कोणत्यातरी धार्मिक उत्सव किंवा अनुष्ठानात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

Guru Gochar
Shani Budh Vakri: ५०० वर्षांनी शनी-बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

कर्क रास

नवीन नोकरी किंवा रोजगार शोधत असलेल्या लोकांसाठी हे गोचर चांगल्या संधी घेऊन येणार आहे. आरोग्याच्या अडचणी कमी होणार आहेत. खर्चांमध्ये बचत शक्य होणार आहे आणि उत्पन्नाच्या स्रोतांमधून चांगला लाभ मिळणार आहे. एखाद्या जुन्या आजारातून कायमस्वरूपी सुटका होण्याची शक्यता आहे.

Guru Gochar
Shani Vakri: 500 वर्षांनंतर दिवाळीला शनी चालणार वक्री चाल; नव्या नोकरीसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

धनु रास

व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. या कालावधीत केलेली खरेदी भविष्यातही फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला काही अनपेक्षित किंवा गुप्त माध्यमातून धन मिळू शकते.

Guru Gochar
Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com