Guru Asta: भरपूर मिळणार पैसा अन् संपत्ती; 12 वर्षांनंतर मिथुन राशीत अस्त होणार गुरु

Guru Asta 2025: भाग्याचा कारक गुरु जुलै महिन्यात मिथुन राशीत अस्त होणार आहे. गुरुच्या या अस्ताचा फायदा काही लोकांना होणार आहे. यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणारे ते पाहूयात.
Guru Ast 2025
Guru Ast 2025saam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रात, देवांचा गुरु हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. यावेळी तो सुमारे १ वर्षात राशी बदलतो. मात्र या वर्षी गुरु ग्रह दुप्पट वेगाने पुढे जाणार आहे. म्हणून तो या वर्षी दोनदा त्याची राशी बदलणार आहे. यावेळी गुरु मिथुन राशीत बसला आहे आणि ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात, गुरु ग्रह देखील अस्त आणि उदय होणार आहे.

१२ जून २०२५ रोजी संध्याकाळी ०७:३७ वाजता गुरुचा अस्त होणार आहे. ९ जुलैपर्यंत याच अवस्थेत राहणार आहे. काही राशीच्या लोकांना सुमारे २७ दिवसांपर्यंत भरपूर फायदे मिळू शकणार आहेत. गुरु ग्रहाचं अस्त होणं काही राशींसाठीच भाग्यवान ठरू शकणार आहे. गुरुच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

Guru Ast 2025
Trigrahi Yog: 100 वर्षांनंतर बुधाच्या राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा

मकर रास

या राशीच्या सहाव्या घरात गुरु ग्रह अस्त करणार आहे. या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. सरकारी कामात बऱ्याच काळापासून येणाऱ्या अडचणींपासून तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. आताआरोग्यही चांगले राहणार आहे.

Guru Ast 2025
Trigrahi Yog: शनीदेव ३० वर्षांनंतर चालणार मीन राशीत मार्गस्थ; ३ राशींना मिळणार नवी नोकरी

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी, गुरु ग्रहाचे अस्त मिश्रित परिणाम देऊ शकते. या राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. काही अडचण येऊ शकते. जर तुम्ही शेअर बाजारात हुशारीने पैसे गुंतवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकणार आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला नफा मिळू शकतो.

Guru Ast 2025
Budh Gochar : ६ जूनपासून या ३ राशींना लागणार लॉटरी; बुध ग्रह मिळवून देणार पैसा

मेष रास

गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकणार आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ शकणार आहे. तुमचे भाऊ-बहिणींशी असलेले संबंध सुधारणार आहे. सकारात्मक विचारसरणीने पुढे जाऊ शकणार आहात. तुम्ही अनेक क्षेत्रात प्रचंड यश मिळवू शकता.

Guru Ast 2025
Shukrawar che Upay : चुंबकासारखा खेचला जाईल पैसा; शुक्रवारी लक्ष्मीची पुजा करताना हे उपाय नक्की करा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com