Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 4th July 2024 : आजचे राशी भविष्य, ४ जुलै २०२४ वार गुरुवार, आज 'या' राशीच्या लोकांच्या कानी आनंदाची वार्ता कानावर पडणार , तुमच्या नशिबात गुरुवारी काय? वाचा राशी भविष्य
Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashi Bhavishya 4th July 2024 :Saam Tv

आजचे पंचाग दि. ४ जुलै २०२४

गुरुवार दिनांक -; ४जुलै २०२४. जेष्ठ कृष्णपक्ष तिथी-चतुर्दशी. नक्षत्र-मृग.योग-वृद्धि .करण-विष्टिरास-वृषभ.दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य.

मेष - मनोबल वाढवा

"मनाचे मनोरे तुटणे म्हणजे काय असते" हे आज जाणवेल. कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अपेक्षित घटना घडणार नाहीत. यासाठी आपले मनोबल वाढवणे हाच पर्याय आहे.

वृषभ - आरोग्याच्या तक्रारी कमी होणार

मन आनंदी, आशावादी राहील. व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आजचा दिवस "आज हैं हम शहनशाह" असा राहील.

मिथुन - मन आनंदी राहील

व्यवसाय मध्ये वाढ होईल. पैशाशी निगडित आवक जावक चांगली राहील. मन समाधानी व आनंदी राहील.

Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashi Bhavishya : संधीचे सोने कराल, गुंतवणूक ठरणार फायदेशीर; वाचा तुमचं आजचं राशी भविष्य

कर्क - पराक्रमात भर पडेल

तुमचं कार्यक्षेत्र आज सुगंधी होणार आहे. कीर्ती, प्रसिद्धी या गोष्टींनी पराक्रमात भर पडेल. मन आनंदात राहील. दोनाचे चार होणे आणि मनगटात बळ म्हणजे काय हे आज कळेल.

सिंह - प्रतिष्ठा वाढणार

मानसन्मान प्रतिष्ठा वाढती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. घरच्यांकडून विशेष सहकार्य लाभे.ल आणि वाटेल "यासाठी केला होता अट्टाहास खास".

कन्या - पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरणार

आज संतती सुखात रममाण होणार आहात. शेअर मधील पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कला, मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती आज वाढणार आहे.

तूळ - तब्येतीच्या तक्रारी वाढतील

तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी आपला वट ठेवावा लागेल. दिवस त्रासाचा असला तरी त्यातून मार्ग काढा.

वृश्चिक - मनोबल चांगले राहणार

आपली मतं व विचार याविषयी आग्रही रहाल. मनोबल चांगले राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळाल्याने सगळे काही सप्तरंगी वाटेल.

धनु - स्वत:ची काळजी घ्या

विनाकारण नको त्या गोष्टींच्याकडे आज ओढा राहील. आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संधी घेऊन आलेला आहे. तुम्ही काळजी घ्या.

Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Weekly Horoscope: आजपासून बदलणार या 5 राशींचे भाग्य, 7 दिवस सूर्यासारखे चमकेल नशीब

मकर - प्रवासाची संधी मिळेल

भाग्यात मिळालेल्या गोष्टी कधीच कुठे जात नाहीत. यावर विश्वास ठेवा. तीर्थयात्रा, लांबचे प्रवास, परदेश गमनाचे योग याच्या संधी सहज उपलब्ध होतील.

कुंभ - कामानिमित्त प्रवास होईल

व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामांमध्ये यश मिळेल. कामासाठी प्रवास होतील.

मीन - आनंदाची वार्ता कानावर येईल

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. स्नेहभोजन, काही आनंद वार्ता कानावर येतील. सुना मुलांमध्ये दिवस आनंदाने व्यतीत होणारा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com