आजचे पंचांग
शुक्रवार,१८ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.
तिथी-प्रतिपदा १३|१६
रास-मेष
नक्षत्र- अश्विनी
योग- वज्रयोग
करण-कौलव
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - सतत चपळता आणि धाडस या गोष्टी आपल्याला नेहमीच आवडतात. आज धाडसाने नवीन गोष्टींच्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल किंवा त्या पार पाडाल. दिवस आनंदी आणि चांगला राहणार आहे. सकारात्मक लहरी येतील.
वृषभ - मनामध्ये उगाचच उलघाल होईल. जुन्या गोष्टींचा विचार, भविष्याची चिंता या संबंधी विचारात रहाल. आपले काय चुकलं? पैशाच्या गोष्टींचा हिशोब आणि अनेक गोष्टींमध्ये मनाची उद्विगता आज राहील.
मिथुन- लोकांना जोडण्याने आयुष्यामध्ये नव्या संधी मिळण्याचा आज दिवस उत्तम क्षण दिवस घेऊन आलेला आहे. प्रयत्नांना पूर्णत्वाचे स्वरूप येईल. दिवस चांगला राहील.
कर्क - वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. गाडीमधून फिरण्याचे/ प्रवास करण्याचे योग येतील. आरामदायी प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी आपला वट राहील. राजकारणामध्ये विशेष आघाडी दिसून येईल.
सिंह - भाग्याने दिलेले हिरावून घेता येत नाही. आज आपण केलेल्या सर्व गोष्टींवर विचार प्रकाश टाकाल. देवा विषयी कृतज्ञतेचे भाव येतील. तीर्थक्षेत्री जाण्याचे बेत आखाल.
कन्या- जोडीदारापासून धनलाभाची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचे व्यवहार होतील. पुढच्या अनेक अडचणी या व्यवहारामुळे सुटतील. आयुष्यात जेवढी मोठी रिस्क तेवढे भविष्याचे रस्ते मोकळे होतील हे ध्यानात घ्या.
तूळ - प्रेमात भरोसा आणि भरवशाचे प्रेम दोघांना एकमेकांकडून मिळण्याचा आज दिवस आहे. जोडीदाराकडून असलेल्या एक इच्छा आकांक्षा पुरती होईन जाईल. दिवस सुखाचा राहील.
वृश्चिक- विनाकारण कटकटी मागे लागतील. कदाचित मानसिकता अस्वास्थ असल्यामुळे या कटकटी आहेत असे वाटेल. ठरवलेल्या गोष्टी करण्यामध्ये अडथळे आणि अडचणी उभे करण्यामध्ये आपले शत्रू यशस्वी होतील.
धनु - प्रेम, प्रणयाला नवे रंग फुटतील. दिवस समतोल राखण्याचा प्रयत्न करा. एकीकडे देवधर्म अध्यात्मात यांत मन ओढ घेईल, तर दुसरीकडे आयुष्य जगावे स्वतःसाठी जगावे अशा आनंदात राहाल. दिवस संमिश्र असेल.
मकर - घर डागडुजीला काढण्याच्या बेतात असाल किंवा कुटुंबीयांच्या बरोबर घरामधून जुन्या गोष्टींची उजळणी घ्याल. घरी काही पाहुण्यांचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे. धावपळीचा दिवस दिसतो आहे.
कुंभ - अक्षरावर विशेष प्रेम जडेल.लेखन साहित्यात विशेष गती आहे. आपल्या बौद्धिक गोष्टींना योग्य ती चालना मिळाल्यामुळे दिवसाची परिणीती समाधानात होईल.
मीन- सर्व गोष्टीत आज प्रसंगावधान राखून पुढे जावे असाच सल्ला आहे. निर्णय घेताना कचरू नका पैशाच्या दृष्टीने दिवस विशेष महत्त्वाचा असा राहणार आहे. गुंतवणूक चांगली ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.