Horoscope Today : शूभ वार्ता! आज अचानक धनलाभ होणार, भाग्य उजळणार; तुमची रास यात आहे का?

horoscope today in Marathi : आजचे राशिभविष्य, १ सप्टेंबर २०२४ : सिंहसह २ राशींनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, वाचा रविवारचे राशीभविष्य
तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Horoscope Today Saam TV
Published On

आजचे पंचाग

रविवार,१ सप्टेंबर २०२४,श्रावण कृष्णपक्ष,शिवरात्री

तिथी- चतुर्दशी २९|२२

रास- कर्क २९|४९ नं.सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-परिघ

करण-विष्टिकरण

दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य

मेष - तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. घरासाठी नवीन काही खरेदी करण्याचे आज योग आहेत. प्रवासाचे बेत आखत असाल तर आज ते सुखकर ठरतील.

वृषभ - जिद्दीने काम करत रहा. पत्रव्यवहारातून फायदा होईल. शेजारी आणि जवळचे लोक यांच्या सहकार्याने कामाचा नवीन टप्पा गाठाल.

मिथुन - अचानक धन लाभाची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. मनामध्ये ठरवलेल्या गोष्टी होतील. घरातल्या लोकांबरोबर सहजगत्या कामे मार्गी लागत आहेत असे आज जाणवेल.

कर्क - आज सुट्टीचा दिवस आहे. आनंद लुटाल महत्त्वाची रेंगाळलेले कामे मार्गी लागतील. मनासारख्या गोष्टी झाल्यामुळे मनोबल उत्तम राहील.

सिंह - तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. दवाखान्याची उगाचच भरपाई करावी लागेल. प्रवास शक्यतो टाळावेत. मनस्ताप वाढेल.

कन्या - अनेकांच्या सहकार्यातून पुढे जाण्याची भावना आहे. आर्थिक लाभ आणि त्यामधून समाधान दोन्ही गोष्टी मिळतील. नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.

तूळ - राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये आघाडी मिळेल. आपल्या वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाच्या कक्षा रुंदावणाऱ्या ठरणार आहेत.दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - भगवंताची कृपा काय आहे हे आज जाणवेल. सहज आणि लिलया गोष्टी होतील. महत्त्वाच्या वार्ता कानी येतील आणि आनंदी आनंद होईल.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Rashi Bhavishya : मीन राशीसाठी लग्नाचा योग, तर तुळ राशीला होईल यशप्राप्ती; तुमच्या भाग्यात आज काय? वाचा

धनु - कोणाच्या नादी लागून अडचणी ओढवून घेऊ नका. वादविवाद टाळावेत ठरवलेली कामे तशीच होतील असं नाही. कामे रखडतील. विलंबाने होतील.

मकर - वैवाहिक जीवन योग्य असेल तर कामाच्या ठिकाणी मन लागते. आजचा दिवस हा वैवाहिक जीवनात समाधानाचा आहे. भागीदारीतही सुसंधी मिळेल.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Rashi Bhavishya : सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश, कुंभसह 5 राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन; वाचा राशीभविष्य

कुंभ - हाताखालील नोकर चाकरांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. केलेल्या गोष्टींचे लगेचच फळ मिळेल असा आजचा दिवस नाही.

मीन - बौद्धिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. उपासनेमध्ये नवे मार्ग मिळतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर्समध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com