Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

Surya Dev Rashi Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा वृषभ राशीचा शासक ग्रह मानला जातो. द्रिक पंचांग नुसार, ऊर्जा, आत्मविश्वास आणि सन्मान यासाठी जबाबदार असलेला सूर्य 14 मे रोजी संध्याकाळी 06.14 वाजता मेष राशीतून वृषभ राशीत जाईल.
Surya Dev Rashi Parivartan
Surya Dev Rashi ParivartanSaam Tv

Surya Dev Rashi Parivartan:

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा वृषभ राशीचा शासक ग्रह मानला जातो. द्रिक पंचांग नुसार, ऊर्जा, आत्मविश्वास आणि सन्मान यासाठी जबाबदार असलेला सूर्य 14 मे रोजी संध्याकाळी 06.14 वाजता मेष राशीतून वृषभ राशीत जाईल. असे मानले जाते की, जेव्हा सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत होतो. 14 तारखेला सूर्याचे संक्रमण अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. तर काहींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यातच कोणत्या राशीला लाभ मिळेल आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे, हे जाणून घेऊ...

वृषभ: तब्येत सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भौतिक सुखसोयींमध्ये जीवन जगेल.

Surya Dev Rashi Parivartan
Saturday Horoscope: आज या राशींवर होणार शनिदेवाची कृपा, प्रत्येक संकटातून मिळेल मुक्ती

सिंह: करिअरमधील प्रत्येक काम अपेक्षित परिणाम देईल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. प्रेम आणि करिअरसह सर्व क्षेत्रात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीच्या नवीन संधींमधून आर्थिक लाभ होईल.

मकर: तुम्ही एक महिना तणावमुक्त जीवन जगाल. कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने आर्थिक लाभ होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. शत्रूंवर विजय मिळवाल.

Surya Dev Rashi Parivartan
Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

कुंभ: सूर्याच्या संक्रमणामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल. बेरोजगारांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरी मिळेल. मात्र येत्या काही दिवसांत तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

उपाय : सूर्य संक्रमणाचा प्रकोप टाळण्यासाठी रविवारी गुळाचे दान करा. रोज सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करावा.

मीन : नोकरीशी संबंधित समस्या दूर होतील. कायदेशीर बाबींमध्ये अडचणी वाढतील. ऑफिसमध्ये खूप व्यस्त वेळापत्रक असेल. अचानक प्रवासाची शक्यता आहे. करिअरमध्ये सर्व कामे अधूनमधून यशस्वी होतील.

उपाय : पुढील एक महिना सूर्यदेवाची उपासना करून त्यांना जल अर्पण करा.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com