Horoscope: वाद टाळा, नव्या ओळखीसह होईल धनलाभ; तुमच्या भाग्यात काय लिहिलंय जाणून घ्या

Sunday Horoscope In Marathi: रविवारचा दिवस अनेकांसाठी आनंदाचा असणार आहे. नवीन ओळखीसह आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेन हे जाणून घ्या.
horoscope in marathi
Sunday Horoscope In Marathi Saam tv
Published On

रविवारी,२८ सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष.

तिथी-षष्ठी १४|२८

रास-वृश्चिक २७|५५ नं. धनु

नक्षत्र-ज्येष्ठा

योग-आयुष्मान

करण-तैतिल

दिनविशेष-ज्येष्ठा वर्ज्य

मेष

तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आज त्यामध्ये सुधारणा होईल. उष्णतेच्या विकारांनी त्रस्त झाल्यासारखे होईल. गैरव्यवहार पासून स्वतःला चार हात लांब ठेवा.

वृषभ

जोडीदाराचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेऊन आज पुढे जावे लागेल. संसारिक सुखात साखरे सारखी गोडी वाढेल. महत्त्वाचे निर्णय आणि बैठका आज पार पडतील .

मिथुन

आजोळी प्रेम वाढेल. मामाचे विशेष सहकार्य मिळेल. आपल्या वृत्तीत बदल करावा लागेल. हित शत्रूंचा त्रास वाढेल.

horoscope in marathi
Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

कर्क

सृजनशीलता वाढीस लागणार आहे. नवनवीन कल्पना आणि युक्ती आपल्यातील प्रज्ञा वर्धित ठरतील. शेअर्स आणि लॉटरी मध्ये फायदा होणार आहे. दिवस चांगला आहे.

सिंह

जनावरांशी निगडित व्यवहार होतील. शेतीवाडी मध्ये विशेष लक्ष घाला. घरातील मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जाण्याची योग आहेत. प्रगती मार्गावर पाऊल ठेवा.

कन्या

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा आजचा दिवस आहे. भावंड सौख्य उत्तम आहे. शेजारी संबंध दृढ होतील. एकमेकांना मदत करून पुढे जाल.

horoscope in marathi
Shani Margi: 30 वर्षांनंतर गुरुच्या घरात सरळ चाल चालणार शनी; 'या' राशींना येत्या काळात होणार धनलाभ

तूळ

"प्रयत्नांती परमेश्वर" असा दिवस आहे. पैसे मिळवण्यासाठी विशेष कष्ट घ्याल. संपत्तीचे निर्णय आज मार्गी लागणार आहे. जोडीदाराची तब्येत जपावी लागेल.

वृश्चिक

"मै जिंदगी का साथ निभाता चला गया" असा दिवस आहे. जे येईल, पदरात पडेल ते सुखाचे मानून घ्यायला सकारात्मकता वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे.

धनू

जाणता अजाणता चुका होणार आहेत. बंधन योग आहेत. दवाखान्यासाठी विनाकारण पैसे खर्च होतील. वस्तू गहाळ होईल. महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस सांभाळा.

मकर

एखाद्या गोष्टीने पेटून उठाल. अनेकांना बरोबर घेऊन कामे कराल. पुढारीपणाची भावना होईल. सामाजिक क्षेत्रात पत वाढेल. आजचा दिवस म्हणजे प्रेरणादायी प्रवास असेल.

कुंभ

लांबचे प्रवास होतील. प्रवासामध्ये नव्या ओळखी होतील. ज्या पुढील कामासाठी तुम्हाला फायदाच्या ठरतील. चांगल्या गोष्टी कानावर येतील. सुखद घटनांचा आजचा दिवस आहे.

मीन

शोभेची बाहुली होऊन राहू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. प्रेमामधील बारकावे ओळखून वागणे आज गरजेचे आहे. कामात व्यत्याय येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com