Horoscope Today : तुम्ही केलेले कष्ट वाया जाणार नाहीत; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा

Horoscope Today in Marathi : आज नवरात्रीची आठवी माळ आहे. आज काही राशीच्या लोकांवर देवीची कृपा राहील. तर काही राशीच्या लोकांनी केलेले कष्ट वाया जाणार नाही.
Horoscope
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचाग

गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष,महालक्ष्मी पूजन.

तिथी-सप्तमी १२|३२

रास- धनु

नक्षत्र- पूर्वाषाढा

योग-अतिगंड

करण-वणिज

दिनविशेष-१३ प. चांगला

Horoscope
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

मेष - तापटपणावर अंमल मिळवण्यासाठी उपासनेसारखा योग्य मार्ग नाही. असेही नवरात्र सुरू आहे वृत्ती शांत होण्यासाठी आज विशेष देवी आराधना करा दुप्पटीने फळ मिळेल. भाग्यवृद्धी होईल.

वृषभ - जोडीदारापासून धनयोगाची आज शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची आवक आज दिसून येते आहे. तरीसुद्धा हा पैसा काळा पैसा नाही ना? हे जाणून घ्या. नको त्या गोष्टी चुकीच्या गोष्टी वाढवून अडचणींचा, संकटाचा सामना करू नका.

मिथुन - द्विधा मनस्थिती आज टाळावी लागेल. एक तर हो किंवा नाही यापैकी बुद्धीला पटेल त्या गोष्टीचा निर्णय घ्या. जोडीदाराविषयी उत्कट भावना येतील. प्रेमाचे रंग बहरतील. दिवस चांगला आहे.

कर्क - पाण्यापासून होणारे आजार आज होऊ शकतात. पाणी उकळून अथवा अॅक्वाचेच घ्या. छोटेच आजार पण ते त्रासाचे ठरतील. निदान लागणार नाही. पण सोसावे लागेल. मानसिक स्वास्थ जपा.

सिंह - योग्य ठिकाणी केलेली नात्यांची गुंतवणूक आज फळाला येईल. प्रेमामध्ये यश आहे दिवसाचा आनंद लुटाल. त्यासाठी काही कला, मनोरंजन यामध्ये मन गुंतवाल.

कन्या - शेतीवाडीचे काही व्यवसाय असतील तर आज त्यामध्ये फायदा होईल. काही व्यवहार असतील त्याचे तर ते मार्गी लागतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींच्या सहकार्याने पुढे जाण्याचा आज दिवस आहे. संधी आली आहे दवडू नका.

तूळ - सन्मान पदके आज आपल्या प्रतिष्ठेत भर घालतील. काही पुरस्कार आपल्याला मिळतील. केलेले कष्ट वाया जाणार नाहीत. प्रवासातून फायदा आहे. बुद्धिवादी गोष्टींवर भर द्या.

वृश्चिक- तिखट आणि मसालेदार काहीतरी खावे अशी उर्मी वाटेल. कुटुंबामध्ये आपला वट राहील. फक्त एक लक्षात ठेवा काही गोष्टी बोलून मनामध्ये आडी न ठेवता व्यक्त केलास आपण इतरांचा विश्वास संपादन कराल.

धनु - "मीच माझ्या रूपाची राणी गं"अशी भावना येईल. स्वतःमध्येच मशगुल असाल. सकारात्मकता वाढेल. ठरवलेली काम नियोजित आणि योग्य वेळेत पार पडल्यामुळे दिवसाचा आनंदाचा टप्पा गाठाल.

Horoscope
Chanakya Niti: घरात पैसा सतत खेळता राहील; फक्त 'या' पद्धतीने करा दिवसाची सुरुवात

मकर - कोणत्या गोष्टीत पैसे खर्च करायचे आणि कुठे कंजूषपणा करायचा आहे आज ठरवा. सुखासाठी खर्च केलेल्या पैशाचं हिशोब नसावा. आज काही गोष्टी अशाच खर्च कराल पण त्याचे सुख उपभोगण्याची मानसिकता ठेवा.

कुंभ - आजचे काम उद्यावर ढकलू नका. कोणत्याही गोष्टी स्वस्थ आणि धिमेपणाने करू नका. अलर्ट रहा. नातेवाईकांमध्ये आपली एक वेगळीच प्रतिमा निर्माण होईल. आपल्याला आदर मिळेल.

मीन - राजकारणामध्ये यश आहे. कधी कधी आपली रास ही ढोंगी बगळ्या सारखी वाटते. पण याच गोष्टी या क्षेत्राला पूरक आहेत असे आहे. फक्त मनस्थिती द्विधा न ठेवता घेतलेले निर्णय काम येतील. मोठे प्रवास घडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com