
अवघ्या काही दिवसात दिवाळी या सणाची धामधूम सुरू होणार आहे. यंदा दिवाळी अत्यंत खास असणार आहे. या वर्षी दिवाळीमध्ये एक विशेष योग निर्माण होणार आहे, १०० वर्षानंतर निर्माण होणारा योग अनेकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवाळीत गुरू ग्रह त्याच्या उच्च राशी कर्कमध्ये वक्र होईल आणि हंस महापुरूष राजयोग निर्माण करेल. यामुळे दिवाळीच्या आधी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी हा दुर्मिळ योग तयार होईल.
गुरूचे कर्क राशीत प्रवेश
ज्योतिषानुसार, गुरू कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य, ज्ञान आणि समृद्धी आणतो यावेळी, कर्क राशीत गुरूचे वक्री भ्रमण हा प्रभाव अधिक शक्तिशाली बनवेल. हे संयोजन तूळ, कर्क आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशींना करिअरमध्ये प्रगती, यश मिळणार आहे.
तूळ राशींसाठी हा योग दहावा असेल जो काम आणि प्रतिष्ठा वाढवतो. या राशींच्या लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नफा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क राशीत शक्तिशाली योग
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग सर्वात प्रभावी असणार आहे यामुळे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात वाढ होईल. कठोर परिश्रमाचे फळ निश्चित मिळेल. सन्मान वाढेल. व्यवसायिकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशींना होईल मोठा फायदा
वृश्चिक राशीसाठी हंस महापुरूष योग नवव्या गतीत असेल यामुळे भाग्य उजडेल. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. स्पर्धात्मक परिक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुसंवादी होईल आणि पालकांचे सहकार्य मिळेल.
१०० वर्षानंतर निर्माण होणारा हंस महापुरूष राजयोग या तिन्ही राशींच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रगती निर्माण करेल.