Thursday horoscope : दिवसभरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील

Thursday horoscope in marath : तुम्हाला दिवसभरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे लागेल. काही लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

मेष : आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. कुटुंबात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दिवसभरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.

वृषभ : तुम्ही वाणीने दुसऱ्या आकर्षित करू शकता. जोडीदार आणि तुमच्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. प्रेमसंबंधात सुधारणा होतील. सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल. हाती घेतलेलं कार्य पूर्ण कराल.

Horoscope
धावपळ होईल, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार चमत्कार

कर्क : दिवस थोडा आव्हानात्मक राहील. पार्टनर काही गोष्टीत साथ देणार नाही. आत्मविश्वास डळमळीत होईल.

सिंह : नातेवाईकांशी झालेले मतभेद कमी होतील. सामाजिक संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या लोकांची साथ मिळेल.

कन्या : नातेवाईक अडचणीत साथ देतील. मानसिक ताण संभावण्याची शक्यता आहे. नाते सुधारण्याची शक्यता आहे. भविष्याबाबत मोठा निर्णय घ्याल.

तुला : आजचा दिवस शुभ ठरेल. नव्या लोकांची भेट होईल. करिअरची नवी संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळेल.

वृश्चिक : आयुष्यात चढ-उतार होईल. नकारात्मक ऊर्जा घेरण्याची शक्यता आहे. कुटुंबात वादाला सुरुवात होईल. दिवसभरात विचारपूर्वक बोलावे.

धनु : दिवसभरात महत्त्वाचे काम पूर्ण कराल. घरातील भांडणामुळे मन अशांत होईल. व्यवसायात सुधारणा दिसून येतील.

Horoscope
मनातल्या इच्छा अपूर्ण राहतील, विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार ठरणार आव्हानात्मक

मकर : आर्थिक फायदा होईल. कुटुंबातील लहान सदस्यांची चिंता सतावेल. पार्टनरसोबत चांगला वेळ व्यथित कराल.

कुंभ : तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याचे संकेत मिळतील. आर्थिक सुधारणा होण्यास सुरुवात होईल.

मीन : वाहन चालवताना काळजी घ्यावी. ऑफिसमध्ये आव्हानाचा सामना करावा लागू शकते. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे फायदेशीर ठरेल.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून दिवसभरात निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com