Friday Horoscope: खर्चावर ठेवा नियंत्रण! शुक्रवार कोणासाठी अडचणींचा तर कोणासाठी असेल आनंदाचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope In Marathi : आज शुक्रवारचा दिवस असून नक्षत्र उत्तरा आहे. आजचा दिवस इतर दिवसापेक्षा वेगळा असणार आहे. अनेक जातकांना आपल्या कुटुंबियांसोबत मनमुराद वेळ घालवण्याचा योग आहे. तर काही राशींसाठी थोडा धकाधकीचा दिवस ठरणार आहे.
horoscope In Marathi
horoscope Saam tv
Published On

शुक्रवार,१२ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-अष्टमी १४|५७

रास- सिंह १०|२१ नं.कन्या

नक्षत्र-उत्तरा

योग-प्रीतियोग

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष

आयुष्यामध्ये धनदौलत महत्त्वाची असते हे आपल्या राशीला चांगलेच ठाऊक आहे. यासाठी आज विशेष प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. वेगवान वाहने आज चालवायला आवडतील. क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे.

वृषभ

शेतीवाडीचे व्यवसायात काहीतरी नाविन्य आणण्याचा आज प्रयत्न कराल. इम्पोर्ट, एक्स्पोर्ट सारख्या गोष्टींवर भर दिला तर विशेष फायदा होईल. दुभत्या जनावरांपासून धन वाढेल.

मिथुन

कदाचित द्विधा मनस्थिती असेल. निर्णय घेण्यासाठी कचरायला होत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीचा भावंडांचा सल्ला घ्या. आज ते नक्कीच मदत करतील. लहान प्रवास होतील. स्वतःवरचा विश्वास वाढेल.

horoscope In Marathi
Aditya mangal rajyog: या वर्षाच्या अखेरीस बनणार आदित्य-मंगल राजयोग; 'या' ३ राशींचा प्रेमात होणार मोठा लाभ

कर्क

दुग्धजन्य, पदार्थ पातळ आज खायला प्यायला जास्त आवडेल. कुटुंबीयांच्या बरोबर आनंदात मेजवानीचे योग आहेत. सुखाची मांदियाळी असेल. दिवस चांगला आहे.

सिंह

धावपळ वाढेल. अर्थात त्याचे आपल्या राशीला काही त्रास नाही. व्यस्त दिवस आपल्याला आवडतो. आपला इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्व अजूनच उठावदार आणि सकारात्मक दिसेल. दिवस आरोग्यदायी आहे .

कन्या

मनस्थिती दोलायमान राहील. काही निर्णय योग्य वेळेत घेलेले बरे असतात. पण आज तसे होणार नाही. थोडे अध्यात्माकडे कल असल्यास स्वस्थ वाटू शकेल. खर्चाला अनेक वाटा फुटतील.

तूळ

नवीन परदेशी भाषा शिकण्यासाठी उत्सुकता वाटेल. त्यामध्ये यशही मिळेल. नव्याने परदेशातील मैत्रीसाठी सुद्धा दिवस चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे.

वृश्चिक

आपले कर्म चांगले ठेवले की आयुष्यात विशेष अडचणी येत नाहीत. हे समजून जा. कष्टाबरोबर कर्म या दोघांची कायम सांगड घालण्यासाठी असाच आपला दिवस आहे. सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गेल्यास प्रगतीचे योग आहे.

धनु

एका हाताने घ्यावे आणि एका हाताने द्यावे. हा फंडा आज अवलंबलात तर दिवस सुयोग्य राहील. एखाद्या गोष्टीचा ताळमेळ साधून पुढे जावे लागेल. निर्णय बरोबर राहतील. दिवस तुमचाच आहे. सद्गुरू कृपा लाभेल.

horoscope In Marathi
Numerology Prediction: मूलांक ७ असलेल्यांसाठी पुढचं वर्ष ठरेल चमत्कारिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात होणार मोठा बदल

मकर

कष्टाला पर्याय नाही असा दिवस आहे. एकटेपणाने अनेक कामे करावे लागतील. अबोल रहावे असेही वाटेल. अर्थात ते आपल्या राशीला रुचते आणि पटतेही. असेच पुढे जा.

कुंभ

नको असलेल्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागला असेल, तर आज त्याचे निकाल लागतील. कोर्टाच्या गोष्टी तुमच्या बाजूने होतील. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. काळजी नसावी.

मीन

शत्रु कुरघोडी करतील. "आपलेच दात,आपलेच ओठ" असे काहीशी अवस्था आज तुमची होईल. संयम बाळगणे गरजेचे आहे.नोकरीमध्ये मात्र चांगली गती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com