Horoscope Today: कोणत्या राशींना मिळेल नोकरीमध्ये प्रगती, कौटुंबिक सुखाची प्राप्ती; कसा असा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

Horoscope Today 28 October 2024: आठवड्याचा पहिला दिवस कसा असेल? दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य.
Horoscope Today: कोणत्या राशींना मिळेल  नोकरीमध्ये प्रगती, कौटुंबिक सुखाची प्राप्ती; कसा असा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

मेष -

आज दिवाळीच्या नवीन दिवसाची सुरुवात होत आहे. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने ऊर्जा येईल. त्यांचा लाभ लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार आज पार पडण्याचा संभव आहे.

वृषभ-

तुमचं कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि आय वृद्धीचे योग आहे.

मिथुन -

विष्णू उपासना फलदायी ठरेल. एखादी महत्त्वाची वार्ता कानी पडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दिवाळीमध्ये भाग्यकारक घटना घडणार आहेत.

Horoscope Today: कोणत्या राशींना मिळेल  नोकरीमध्ये प्रगती, कौटुंबिक सुखाची प्राप्ती; कसा असा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
Dhanteras 2024: धनत्रयोदशीला शतकानंतर तयार होणार त्रिग्रही योग; 'या' राशींची होणार दिवाळी, पैसाही हाती येणार

कर्क -

सणासुदीच्या वेळी तब्येतीची काळजी विशेष आपल्याला घ्यावी लागेल. आरोग्याचा तक्रारी संभवतील. दैनंदिन कामे बिघडण्याची आज शक्यता आहे. पण सणावर विरजण नको.

सिंह -

जोडीदारासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकाऱ्यांना घेऊन वाटचाल कराल.

कन्या-

खाण्यावर जरा नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. सणाच्या तोंडावर तब्येतीच्या तक्रारी नकोत. मात्र हित शत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य आपल्याला लाभेल.

Horoscope Today: कोणत्या राशींना मिळेल  नोकरीमध्ये प्रगती, कौटुंबिक सुखाची प्राप्ती; कसा असा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
Lakshmi Mata: घरात सुखाची भरभराट आणि लक्ष्मी मातेचा वास हवा? तर करा 'हे' उपाय

तूळ -

आर्थिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे धाडस कराल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. दिवाळीमुळे घरचे वातावरण छान राहील. संतती सुवार्ता कानी येतील.

वृश्चिक -

सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे सण साजरा करावा असं आपल्याला नेहमीच वाटते. आज त्यामध्ये भर पडणार आहे. प्रॉपर्टी सौख्य लाभेल. उत्साह उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल.

धनु-

आपला पराक्रम वाढेल. जिद्दीने कार्य कराल. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहिल्यामुळे दिवाळीचा आनंद दुप्पट होईल.

मकर -

जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण सणामुळे आनंदी राहील. नवीन वस्तू आणि अलंकार खरेदीचे आज योग आहेत.

कुंभ -

आज रमा एकादशी सारखा उत्तम दिवस आहे. दिवाळीची सुरुवात आज पासून होत आहे. सकारात्मकता वाढेल आपले आरोग्य उत्तम राहील. आपली जी मते आहात त्याविषयी तुम्ही आग्रही आणि ठाम राहणार आहात.

मीन -

आनंदी राहण्याचा सल्ला आहे कारण काही गोष्टी आपल्या बाजूने नकारात्मक घडतील. जसे की कोणाच्या सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. पण दिवाळीचा आनंद लुटाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com