Sun Transit In Mesh And Mars Gochar
Sun Transit In Mesh And Mars Gocharsaam tv

Grah Gochar: एप्रिलमध्ये मंगळ-सूर्य बदलणार आपली चाल; करियर-व्यापारातून मिळणार पैसाच पैसा

Sun Transit In Mesh And Mars Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव लवकरच आपल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. याच वेळी, मंगळ मिथुन राशीमधून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. या ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना मोठे आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे.
Published on

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिना खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे एप्रिल महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशीमधून बदल करणार आहेत. एप्रिल महिन्यात मंगळ ग्रहांचा सेनापती आणि सूर्य ग्रहांचा राजा त्यांची राशी बदलणार आहेत. दरम्यान या ग्रहांच्या स्थिती बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, सूर्य देव आपल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी, मंगळ मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या भाग्य उजळू शकणार आहे. या राशींच्या संपत्ती आणि मालमत्तेत प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत ते पाहूयात.

Sun Transit In Mesh And Mars Gochar
Shukra Gochar: 12 मार्चपासून 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र गोचरमुळे आर्थिक स्थिती सुधारणार

मेष रास

सूर्य आणि मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. मंगळ ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या घरात भ्रमण करणार आहे. या वेळी तुम्हाला भौतिक सुखं मिळणार आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. कौटुंबिक शांतीही राहणार आहे.

मीन रास

सूर्य आणि मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा किंवा व्यवसाय योजनेचा विचार करत असाल, तर ते सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे.

Sun Transit In Mesh And Mars Gochar
Zodiac Signs: कुंभ राशीत शुक्र-शनीची युती करणार मालामाल; 'या' राशींच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा

तूळ रास

सूर्य आणि मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. मंगळ ग्रह तुमच्या राशीच्या कर्म घरात भ्रमण करणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. जर गेल्या काही दिवसांपासून जोडप्यात मतभेद असतील तर परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या काही गोष्टींमुळे चांगला परिणाम मिळणार आहे.

Sun Transit In Mesh And Mars Gochar
Shani-Chandra Yuti: 26 मार्चपासून कुंभ राशीत बनणार शनी-चंद्र युती; 'या' 3 राशींवर शनीची कृपा, चांगले दिवस होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com