Trigrahi Yog: 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि राहू बनवणार त्रिग्रही योग; या राशींच्या नशीबाचा एका रात्रीत होणार कायापालट

Trigrahi Yog In Kumbh: १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा सूर्य, शुक्र आणि राहू यांचा त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत दुर्मिळ असून काही राशींसाठी तो जीवन बदलणारा ठरणार आहे.
Trigrahi Yog
Trigrahi Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात एक खास योग तयार होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्रिग्रही योग तयार होईल. ६ फेब्रुवारी रोजी धनाचा कर्ता शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, तर १३ फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत गोचर करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राहू आधीच कुंभ राशीत स्थित आहे. त्यामुळे या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. जो काही राशींचं भाग्य उजळवू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे तर काही राशींच्या आर्थिक मदत होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Trigrahi Yog
Horoscope: शुभ काळ सुरू! 'या' तीन राशींसाठी आजचा दिवस ठरणार उत्तम, शशी योगामुळे मिळणार आर्थिक लाभ आणि यश

मकर रास

तुमच्या राशीच्या धन आणि वाणी क्षेत्रात ही युती होणार आहे. त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. आर्थिक समस्या देखील सोडवल्या जाऊ शकतात. या काळात योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं नशीब बदलणार आहे.

Trigrahi Yog
Sun transit: जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्य करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, प्रत्येक कामात मिळेल यश

मिथुन रास

त्रिग्रही योगाची निर्मिती मिथुन राशीला चांगले दिवस आणणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात होणार आहे. त्यामुळे या काळात नशीब तुमच्यासोबत राहणार आहे. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. आत्मविश्वास वाढणार असून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक प्रभावशाली वाटाल.

Trigrahi Yog
Zodiac signs success: कृष्ण तृतीया आणि मिथुन चंद्र; आजचा दिवस कोणासाठी उघडणार यशाचे दरवाजे?

धनु रास

तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकणार आहात. जर तुमचा व्यवसाय परदेशांशी जोडलेला असणार आहे.

Trigrahi Yog
Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com