कोरोना काळात तणावामुळे महिलांच्या मासिक पाळीत अनियमितता : सर्वेक्षण

menstrual.jpg
menstrual.jpg

कोरोना Covid 19  महामारीचा   केवळ अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे असे नाही तर कोरोनाचा स्त्रियांच्या आरोग्यवरही दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना महामारीमुळे भारतीय महिलांची मासिक पाळी Menstruation अनियमित झाल्याचे एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.  दरवर्षी 28 मे  रोजी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो.  या पार्श्वभूमीवर एव्हरटीन कंपनीने आपल्या सहाव्या वार्षिक मासिक पाळी स्वच्छता सर्वेक्षण अहवालात Menstrual hygiene survey report याबाबत  खुलासा केला आहे. त्याअंतर्गत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांमधील  18 ते 35 वयोगटातील 5000  महिलांचे सर्वेक्षण केले आहे.  (Menstrual irregularities in women due to stress during corona: Survey) 

- 41 टक्के महिलांमध्ये मासिक पाळीत नियमितता 
या सर्वेक्षणात कोरोना साथ आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे महिलांच्या मासिक पाळीवर झालेला परिणामाचा विशेष अभ्यास करण्यात आला आहे.  कोरोनामुळे 41 टक्के महिलांनी  त्यांची मास्क पाली अनियमित झाल्याचे सांगितले आहे.    मात्र या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण महिलांपैकी केवळ 13.7  टक्के महिलांनाच कोरोनाची लागण झाली होती.

- 64.5 टक्के महिलांच्या तणावात वाढ 
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 64.5 टक्के महिलांनी कोरोना आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्यातील तणाव आणि चिंता वाढवली असल्याचे म्हटले आहे.  यामुळेच  महिलांची  मासिक पाळी  अनियमित झाल्याचे अंदाज वर्तवला आहे.  सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी 34.2 टक्के महिलांनी त्यांच्या मासिक पाळीत होणाऱ्या स्त्राव बदल झाल्याचे म्हटले आहे.

-28.8 टक्के महिलांच्या मासिक पाळीत असामान्य बदल
धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळात एकदाही मासिक पाळी आली नसल्याचे 20 टक्के महिलांनी म्हटले आहे. याशिवाय 29.2 टक्के महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान त्यानं होणाऱ्या वेदनांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. तसेच, 28.8 टक्के महिलांनी त्यांच्या मासिक पाळीत असामान्य बदल झाल्याचे म्हटले आहे.  तथापि, याबाबत  पॅन हेल्थकेअरचे सीईओ चिराग  पैन यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या समाजात मासिक पाळीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र या विषयावर भारत आणि जगभरात सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com