आयुष्य आणि करिअरच्या योग्य समतोला साठी - या गोष्टी करा

आयुष्य आणि करिअरच्या योग्य समतोला साठी - या गोष्टी करा

पुणे : सध्या तुमच्या आमच्यातील प्रत्येकजण करिअरच्या मागे धावू लागला आहे. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय. हे करत असताना मानासिक आरोग्याचे मात्र तीन-तेरा होत आहेत. याकडं दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. ऑफिसमधल्या कटकटींचा तुमच्या कामावर आणि दैनंदिनीवरही होत असतो. त्यामुळे ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही अधिक प्रसन्न आणि उत्साही असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. त्या फॉलो केल्या तर, तुम्हाला तुमच्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. 

ऑफिसच्या ऍक्टिविटिमध्ये सहभागी व्हा
तुमच्या ऑफिसच्या एचआर विभागाकडून योगा, एरोबिक्स, मेडिटेशन अशा ऍक्टिविटींचे आयोजन केले जात असेल तर, त्यात आवर्जुन भाग घ्या. मुळात अशा ऍक्टिविटी तुमच्यावरील ताण हलका करण्यासाठी आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आयोजित केलेल्या असतात. त्याला टाळू नका. यामुळे तुमच्यावर असलेल्या दबावाला मोकळी वाट मिळेल तसेच, ऑफिसमधील सहकाऱ्यांशी एका वेगळ्या वातावरणात तुम्हाला भेटता येईल. यातून त्यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यालाही मदत होईल. 

वरिष्ठांशी चर्चा करा
तुमच्या मनावर एखादे दडपण असेल किंवा, एखाद्या गोष्टीवरून तुम्ही ऑफिसमध्ये सतत अस्वस्थ असाल तर, तुम्हाला ही बाबा तुमच्या वरिष्ठांच्या कानावर घालणे आवश्यक आहे. यात कोणत्याही प्रकारची भीड बाळगू नका. वरिष्ठांशी बोलून मन मोकळं करणं हा उत्तम पर्याय असू शकतो. यातून तुम्हाला ताण हलका करण्याचा मार्ग मिळू शकतो किंवा, तुम्हाला बदल करायचा असल्यास त्यावरही चर्चा करता येऊ शकते.

तुमची कामाची जागा सजवा
तुमची कामाची जागा प्रसन्न राहील, याकडे लक्ष ठेवा. त्यासाठी ती जागा थोडी सजवा. जागा छोटी असली तरी त्याचा विचार करू नका. तुम्हाला प्रेरणा देतील असे कोट्स किंवा वाक्ये तुमच्या नजरेत ठेवा. तुमच्या कुटुंबातील आवडत्या व्यक्तींचे किंवा तुमचे प्रेरणास्थान असलेल्या खेळाडू तसेच यशस्वी व्यक्तींचे फोटो समोर ठेवा. या गोष्टी तुम्हाला तुमच्या धेय्याची आठवण करून देत राहतील आणि तुमच्या कामातही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

समतोल ठेवा
तुमचे वैयक्तिक आयुष्य आणि ऑफिसचे काम या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. तुमचे काम हे तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे आयुष्य आणि करिअर याचा योग्य समतोल ठेवा. कामाबरोबरच कुटुंबाला आणि स्वतःला वेळ द्या. 

गॉसिप टाळा
प्रत्येक ऑफिसमध्ये तुम्हाला राजकारणाला सामोरं जावं लागतं. अकारण त्याच्या चर्चेत पडू नका. याचा तुमच्या कामावर नकळत परिणाम होत असतो. स्वच्छ मनाने ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीला सामोरे जा. यामुळे तुम्हाला हलके वाटू लागेल आणि तुमच्या नकारात्मक भावना येणार नाहीत

Web Title: Life style five tips to improve your mental health at work place

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com