
मराठी चित्रपट सृष्टीतलं एक गाजलेलं व्यक्तीमत्व म्हणजे महेश मांजरेकर. हे मराठी अभिनेते तथा दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. यांनी एकेकाळी मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यातच त्याच्या यशाचा मोलाचा वाटा म्हणजे त्यांचा 'झपाटलेला' हा चित्रपट. त्याचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहेत. आता महेश मांजरेकर यांनी तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. नुकतेच त्यांनी साईबाबांच्या मध्यान आरतीला हजेरी लावत समाधीचे दर्शन घेतले.
आगामी काळात झपाटलेला- मी तात्या विंचू हा येणार आहे आणि त्यात अभिनेते 'लक्ष्मीकांत बेर्डे' असतील आणि हे एक सरप्राइज असल्याचे महेश कोठारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. गाजलेल्या झपाटलेला चित्रपटाचा तिसरा पार्ट हिट व्हावा यासाठी महेश कोठारे यांनी चरणी प्रार्थना केलीय. महेश कोठारे यांनी साईबाबांचीच कृपा माझ्यावर असल्याचे सांगितले. पुढील व्हिडीओ द्ववारे तुम्ही पाहू शकता. त्यात एक सरप्राईज असल्याचं महेश मांजरेकरांनी सांगितले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ' माझा फोर्थ कमिंग प्रोजेक्ट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आदिनाथचा पण स्वत:चा एक चित्रपट सुरू होतोय. माझा आणखी एक नवीन चित्रपट सुरू होतोय. तसेच 'झपाटलेला' - मी तात्या विंचू कमिंग सून ...' असं त्यांनी म्हंटलं आहे. ते मंदीरात हे सुद्धा म्हणाले की, ' माझ्या कामावर साईबाबांचीच कृपा आहे आणि म्हणून मी आदिनाथला म्हणालो की, मी साईबाबांचे दर्शन घेऊन येतोय. झपाटलेला तीन या चित्रपटाचं नाव नुसतं झपाटलेला आहे . मी तात्या विंचू असं त्याचं खालचं सबटायटल याच्यामध्ये लक्षा आहे आणि ते एक सरप्राईज आहे.' असा शेवट त्यांनी केला.
झपाटलेला ३ नव्या रुपात
'झपाटलेला' , 'झपाटलेला २' या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनीच 'झपाटलेला ३' या चित्रपटाचा धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतला आहे. रजनीश खनुजा आणि महेश कोठाके यांच्याल संयुक्त विद्यमानातून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. यात त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा आकर्षक ठरणार आहे. आधी बाप मग मुलगा असे दोघीही उत्कृष्ठ नट आपल्याला लाभलेले आहेत.
या सुपरहिट होणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले, "झपाटलेला चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंमबहूना त्याहून जास्त ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. "झपाटलेला ३" च्या कथानकाची भट्टी एकदम जमून आली असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक धमाल प्रवास ठरणार आहे."
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.