Yere Yere Paisa 3: ५ कोटी की सोन्याची बिस्किट नक्की मामला काय? 'येरे येरे पैसा ३' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Yere Yere Paisa 3 Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.
Ye Re Ye Re Paisa 3
Ye Re Ye Re Paisa 3Saam Tv
Published On

Yere Yere Paisa 3 Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!

Ye Re Ye Re Paisa 3
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाने तिच्या मृत्यूआधी घेतलं होतं हे इंजेक्शन; मैत्रिणीने केला मोठा खुलासा, म्हणाली 'मी तिथेच उभी...'

राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’

Ye Re Ye Re Paisa 3
Bigg Boss 19: सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडची बिग बॉस १९ मध्ये होणार एन्ट्री...? होणार एंटरटेनमेंटचा डबल धमाका

रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com