Mardaani 3: लाल डोळे, चेहऱ्यावर राग मर्दानी ३ मध्ये क्रूर अम्माची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण?

Mardaani 3: यश राज फिल्म्सने नुकताच प्रदर्शित केलेला मर्दानी 3 चा ट्रेलर अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये एसीपी शिवानी शिवाजी रॉयला टक्कर देणारी अभिनेत्री कोण याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
Mardaani 3
Mardaani 3Saam Tv
Published On

Mardaani 3: यश राज फिल्म्सने नुकताच प्रदर्शित केलेला मर्दानी 3 चा ट्रेलर अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एसीपी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणी मुखर्जीचे दमदार कमबॅक तर लक्ष वेधून घेतच आहे, पण यावेळी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे चित्रपटातील खलनायिका ‘अम्मा’ने. ही भूमिका अभिनेत्री मल्लिका प्रसाद यांनी साकारली असून, त्यांच्या एन्ट्रीने अम्मा हे पात्र भीती, द्वेष आणि कुतूहल यांचे मिश्रण ठरत आहे.

मर्दानी फ्रँचायझीने यापूर्वीही बॉलीवूडला लक्षात राहणारे आणि अंगावर काटा आणणारे खलनायक दिले आहेत. मर्दानी 3 मध्येही अम्मा ही एका क्रूर मानवी तस्करी जाळ्याची सूत्रधार म्हणून समोर येते. ट्रेलरमध्ये तिची भेदक नजर, थंड डोक्याने आखलेले कटकारस्थान आणि रॉ स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांना थक्क केले करते. शिवानी आणि अम्मा यांच्यातील संघर्ष हा चित्रपटाचा सर्वात थरारक भाग ठरणार असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते.

Mardaani 3
Shiv Thakare Wedding: लग्नाला मज्जा आली...; लग्न नाही म्यूझिक व्हिडिओ, शिव ठाकरेच्या गुपचुप केलेल्या लग्नाचं गुपित कळलं

मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना मल्लिका प्रसाद म्हणतात की, मर्दानी 3 हा त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. अम्मा हे पात्र वाईट असले तरी त्यात खूप छटा आहे. ही भूमिका साकारताना स्वतःच्या मर्यादा मोडाव्या लागल्या आणि स्वतःच्या अंधाराशी समोरासमोर जावे लागले, असे त्या सांगतात. दिग्दर्शक अभिराज मिनावाला, निर्माता आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्स यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Mardaani 3
Payal Gaming Private Video: प्रसिद्ध यूट्यूबरचा MMS व्हायरल, 19 मिनिटांचा धक्कादायक व्हिडिओ; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला मर्दानी 3 सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्याची फ्रँचायझीचा भाग आहे. पहिल्या भागात मानवी तस्करीचे भयावह वास्तव, दुसऱ्या भागात सिरीयल गुन्हेगाराची विकृत मानसिकता आणि आता तिसऱ्या भागात समाजातील आणखी एका काळ्या वास्तवाचा शोध घेण्यात येणार आहे. मर्दानी 3 हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, अम्मा आणि शिवानी यांचा हा थरारक सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com