Model Gigi Hadid: वरून धवनच्या एका 'किस'मुळे चर्चेत आलेली मॉडेल गिगी हदीद नेमकी आहे तरी कोण ?

Who Is Gigi Hadid: गिगी हदीद एक अमेरिकन सुपरमॉडेल आणि टेलिव्हिजन स्टार आहे.
Who Is Gigi Hadid
Who Is Gigi HadidSaam TV

Gigi Hadid and Her Net Worth: अमेरिकन मॉडेल गिगी हदीद सध्या खूप चर्चेत आहे. गिगी नुकत्याच पार पडलेला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात झाली होती. या कार्यक्रमात वरुण धवनने तिला स्टेजवर नेले आणि उचलून गेयन तिला किस केले. त्यानंतर गिगीचे नाव चर्चेत आले.

गिगी हदीद एक अमेरिकन सुपरमॉडेल आणि टेलिव्हिजन स्टार आहे. गिगीचे नाव जगातील लोकप्रिय मॉडेल्समध्ये घेतले जाते. तिचा जन्म 23 एप्रिल 1995 रोजी झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गिगीने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली.

Who Is Gigi Hadid
Gautami Patil News: लाखो दिलों की धडकन... गौतमी पाटीलचा आवडता क्रिकेटपटू कोण?

ब्रिटिश फॅशन कौन्सिलने 2016 मध्ये गिगीला इंटरनॅशनल मॉडेल ऑफ द इयरचा हा किताब दिला होता. एवढेच नाही तर 2013 मध्ये गिगीचे नाव न्यूयॉर्क फॅशन वीकच्या जगातील टॉप मॉडेल्सच्या यादीत समाविष्ट केले आहे. गिगीची एकूण संपत्ती $30 दशलक्ष आहे.

गिगीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर, गिगीने आंतरराष्ट्रीय गायक झेन मलिकला डेट करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची बरीच चर्चा झाली. दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2020 मध्ये दोघेही एका मुलीचे पालक झाले.

गिगीचा प्रवास इतका सोपा नव्हता. 2021 मध्ये तिचा पती झैन मलिकने गिगीच्या आईविरोधात हिंसाचाराची याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये तिची आई दोषी आढळली. यानंतरच हे जोडपे विभक्त झाले. 2022 मध्ये, GG आणि Leonardo DiCaprio एकत्र दिसले होते. त्यांच्या अफेअरच्या अफवाही उठल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com