Oscars 2023: ऑस्करमध्ये सर्वात जास्त पुरस्कार मिळालेला चित्रपट 'Everything Everywhere All at Once' कुठे पाहता येईल? जाणून घ्या

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक ऑस्कर जिंकणारा चित्रपट ठरला आहे.
Everything Everywhere All at Once Best Film At Oscars 2023
Everything Everywhere All at Once Best Film At Oscars 2023Instagram @michelleyeoh_official

Where To Watch Best Oscars Film: 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट सध्या चर्चेत . या सुपरहिरो कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकण्यासह एकूण सात पुरस्कार जिंकले आहेत. डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट दिग्दर्शित या चित्रपटाला 11 विभागात नामांकन मिळावी होती.

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

Everything Everywhere All at Once Best Film At Oscars 2023
Bhagyashree Mote Sister: अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधुचा संशयास्पद मृत्यू; चेहऱ्यावर आढळल्या जखमा

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक ऑस्कर जिंकणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण टीमच्या आनंदाला पारावार उरला नाही. या चित्रपटाचे हे सर्वात मोठे यश आहे.

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' मार्च २०२२ मध्ये यूएसमध्ये प्रदर्शित झाला. सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला भारतात येण्यासाठी अजून काही महिने आहेत. हा चित्रपट सध्या OTT प्लॅटफॉर्म SonyLiv वर स्ट्रीम केला जात आहे.

चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचे झाले तर, या चित्रपटात मिशेल योह, के हुई क्वान, स्टेफनी हसू, जेम्स वोंग आणि जेमी ली कर्टिस सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट एका चिनी अमेरिकन महिलेवर आधारित आहे. ही महिला पती Waymondसोबत वॉशिंग मशीन चालवते. Waymond आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा प्रयत्न करत आहे. या जोडप्याला जॉय ही मुलगी असते. हा चित्रपट योह या पत्रावर आधारित आहे. हे पात्र जगाला स्वतःच्या ऑल्टरनेटिव्हच्या मदतीने मल्टीव्हर्सला त्याच्या सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com