Akshay Kumar: बांद्राच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये आहे या अभिनेत्रीचा फ्लॅट; अक्षय कुमारने केली पोल- खोल

Akshay Kumar: अक्षय कुमार 'व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया' या नवीन रिअॅलिटी शोसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा रिअॅलिटी शो आज, २७ जानेवारी रोजी टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Akshay Kumar
Akshay KumarSaam Tv
Published On

Akshay Kumar: अक्षय कुमार एका नवीन शोसह टेलिव्हिजनवर परतला आहे.अक्षयचा शो, 'व्हील ऑफ फॉर्च्यून' आज, २७ जानेवारी रोजी टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना स्पर्धकांना लाखो रुपये कमवण्याची संधी देणार आहे. कपूर कुटुंबाची लेक अभिनेत्री करिश्मा कपूर देखील शोच्या एका भागात सहभागी होणार आहे. दोन्ही बहिणी, करिश्मा आणि करीना यांचे अक्षय कुमारशी जवळचे नाते आहे आणि आता करिश्मा अक्षयच्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. जिथे अक्षयने तिच्यासोबत खूप मजा केली आणि तिच्या मालमत्तेबद्दल तिची चेष्ठा केली. अक्षय म्हणाला की करिश्मा आणि कपूर कुटुंबाकडे वांद्रे येथील प्रत्येक इमारतीत एक फ्लॅट आहे.

करिश्माकडे बरेच फ्लॅट आहेत

करिश्मा कपूरची चेष्ठा करत अक्षय म्हणाला, "बांद्रामध्ये प्रत्येक इमारतीत हिचा फ्लॅट आहे आणि फ्लॅटच्या शेजारी असलेल्या साइनबोर्डवर 'के कपूर' लिहिलेले आहे, ती तिचं कधी पूर्ण नाव लिहित नाही. कपूर कुटुंबात कोणीही पूर्ण नाव लिहित नाही. तिची आई, बबिता कपूर यांच्या फ्लॅटच्या नेमप्लेटवर 'बी कपूर' लिहिलेले आहे. एक दिवस मी त्यांना विचारले की ते इतके फ्लॅट का खरेदी करतात? त्यांनी मला सांगितले की ते सांताक्रूझ आणि खारमध्येही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत आहेत. ते कोणत्याही इमारतीत एकापेक्षा जास्त फ्लॅट खरेदी करत नाहीत आणि करिश्मा दररोज रात्री वेगळ्या फ्लॅटमध्ये झोपते.

Akshay Kumar
Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

करिश्मा अक्षयचे गुपित उघड करते

अक्षयचे बोलणे ऐकून करिश्माला हसू आवरता आले नाही आणि मग तिने अक्षयची खिल्ली उडवली. करिश्मा म्हणाली, "काहीही... तुम्हाला माहिती आहे, याने संपूर्ण जुहू विकत घेतला आहे." हे ऐकून अक्षयही हसायला लागला. अक्षय कुमारने कपूर बहिणींना त्यांच्या प्रोपर्टीसाठी चिडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, त्याने "द ग्रेट इंडियन कपिल शो" मध्ये करीना कपूरला मस्करीत म्हटले होते की, "या दोन्ही बहिणी इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि वांद्रेमधील प्रत्येक इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे."

व्हील ऑफ फॉर्च्यून

व्हील ऑफ फॉर्च्यून २७ जानेवारीपासून टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. सोनी टीव्ही आणि सोनी लिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये सेलिब्रिटींना मजा, शब्दांचे खेळ आणि १ कोटी पर्यंतच्या मोठ्या बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल. या शोचे सूत्रसंचालन अक्षय खन्ना करत आहे. तर या शोमध्ये अनेक कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com