Bigg Boss 16 Trophy: रत्नजडीतआहे 'बिग बॉस १६ची ट्रॉफी, किंमत देखील आहे भारी

'बिग बॉस' हा शो वेगळा होता आणि म्हणूनच यावेळची ट्रॉफी पण खास आहे.
Bigg Boss 16 Trophy
Bigg Boss 16 TrophyInstagram @colorstv

Bigg Boss 16 Trophy Cost: 'बिग बॉस १६'चा आज महाअंतिम सोहळा म्हणजे ग्रँड फिनाले आता काही तासात सुरू होणार आहे. बिग बॉसमध्ये जशी स्पर्धकांची चर्चा असते तशीच चर्चा 'बिग बॉस'च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीची देखील असते. यावेळी 'बिग बॉस' हा शो वेगळा होता आणि म्हणूनच यावेळची ट्रॉफी पण खास आहे.

शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम, प्रियांका चहार चौधरी आणि शालिनी भनोत हे 'बिग बॉस १६'चे टॉप ५ स्पर्धक आहेत. या स्पर्धाकांना इथपर्यंत पोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

Bigg Boss 16 Trophy
Shiv Thakare Parents Video: शिवच्या आई- वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, अमरावतीतून चाहत्यांना व्हिडिओ शेअर करत केली विनंती

कुणाला मध्यरात्रीच घरातून काढण्यात आले. कुणाच्या त्रिकोणी प्रेमाच्या चर्चा रंगल्या. अंकित-प्रियांकाच्या जोडीने सर्वांची मनं जिंकली. एमसी स्टॅनची भाषानकुणाला हसवलं तर कुणाला रडवलं. 'बिग बॉस'च्या घरात असूनही घराबाहेरील प्रकरणामुळे साजिद खान गाजला. अब्दुल गोंडसपणा आणि शिवची जीव लावण्याची कला. यामुळे 'बिग बॉस १६' सीझन खूप गाजला.

यावेळी जसा 'बिग बॉस'चा सिझन खास होता तशीच यावेळची ट्रॉफी सुद्धा खास आहे. युनिकोर्नच्या आकाराची ही ट्रॉफी पाहताच तिला हातात घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. निर्मात्यांनी खूप विचार करून ही ट्रॉफी बनवली आहे.

बिग बॉसच्या ट्रॉफीला युनिकॉर्नचा आकार दिला आहे. युनिकॉर्न हा असामान्य प्राणी आहे. म्हणूनच कदाचित या ट्रॉफीला हिर्याने आणि सोन्याने सजविले आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीची किंमत ९ लाख ३४ हजार आहे. ट्रॉफीवर सुबकदार हिऱ्याचे काम करण्यात आले आहे. तसेच ट्रॉफीवर बिग बॉसचा लोगो लावण्यात आला आहे आणि ही चमचमणारी ट्रॉफी विजेत्याला देण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com